चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठा उलटफेर, इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर! या संघानं इंग्लंडला काढलं बाहेर!

0

पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अत्यंत रोमांचक सामना पार पडला. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळविण्यात आला, ज्यामध्ये अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत मोठा उलटफेर केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने 8 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे.

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडसमोर तब्बल 326 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, इंग्लंडने आपल्या सर्व विकेट्स गमावून 317 धावाच करू शकल्या.

इंग्लंडची खराब सुरुवात

इंग्लंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी फक्त 30 धावांमध्ये 2 विकेट गमावल्या. त्याआधी, अझमतुल्लाह उमरझाईने फिल सॉल्टला (12 धाव) क्लीन बोल्ड केले. त्यानंतर मोहम्मद नबीने जेमी स्मिथला (9) झेलबाद केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

बेन डकेटने जो रूटसोबत 68 धावांची भागीदारी केली पण तो जास्त काळ टिकू शकला नाही. इंग्लंडला 98 धावांवर तिसरा धक्का बसला. रशीद खानने डकेटचा बळी घेतला. त्यानंतर जो रूटने जोस बटलरसह 83 धावा जोडल्या.

पण इंग्लंडचा अर्धा संघ 216 धावांवर बाद झाला. 38 धावा काढल्यानंतर बटलरही उमरझाईचा बळी ठरला. 10 धावा काढल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनही गुलबदिनचा बळी ठरला. अफगाणिस्तान संघाने इंग्लंडला 287 धावांवर सर्वात मोठा धक्का दिला. उमरझाईने जो रूटला झेलबाद केले. 111 चेंडूत 120 धावा काढल्यानंतर रूट बाद झाला.

ऐतिहासिक खेळी

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अफगाण संघासाठी इब्राहिम जाद्रानने ऐतिहासिक खेळी केली आणि जलद शैलीत शतक झळकावले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा तो पहिला अफगाणिस्तानी खेळाडू ठरला आहे. या सामन्यात जाद्रानने 146 चेंडूत 177 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 6 षटकार आणि 12 चौकार मारले.

जाद्रानन व्यतिरिक्त, अझमतुल्लाह उमरझाईने 41, शाहिदीने 40 आणि मोहम्मद नबीनेही 40 धावांची शानदार खेळी केली. यामुळे अफगाणिस्तान संघाने 7 विकेटच्या मोबदल्यात 325 धावा केल्या. इंग्लंडकडून गोलंदाजीत फक्त जोफ्रा आर्चरच चमकदार कामगिरी करू शकला. या वेगवान गोलंदाजाने सर्वाधिक 3 बळी घेतले. लियाम लिव्हिंगस्टोनला 2 बळी मिळाले. तर जेमी ओव्हरटर्न आणि आदिल रशीद यांनी 1-1 विकेट घेतल्या.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

या सामन्यात अफगाणिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने रहमानउल्लाह गुरबाज 7 धावांवर बाद केले. आणि त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर सादिकुल्लाह एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर काही वेळातच रेहमत शाह ४ धावांवर बाद झाला. ज्यांना आर्चरने बाद केले. अशाप्रकारे अफगाण संघाचा स्कोअर 37/3 झाला. त्यानंतर इब्राहिम जाद्रानन आणि हशमतुल्लाह शाहिदी यांनी चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. आदिल रशीदने शाहिदीला क्लीन बोल्ड केले आणि भागीदारी संपुष्टात आणली.

एकदिवसीय विश्वचषकात शेवटच्या वेळी दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते, तेव्हा अफगाणिस्तानने दिल्लीत तत्कालीन चॅम्पियन संघाला 69 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून सर्व क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.