आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना सूरू आहे.या सामन्याच्या सूरूवातीला एक मोठी घटना घडली आहे. त्याचं झालं असं की दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात आले असताना अचानक भारतीय राष्ट्रगीत वाजल्याची घटना घडली आहे. या घटनेचा होत आहे.






चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांमधील सामना लाहोरच्या गदाफी स्टेडिअमवर खेळवला जातोय. हा सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर एक मजेशीर घटना घडली आहे. त्याचं झालं असं की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ राष्ट्रगीतासाठी आले असता भारताचे राष्ट्रगाण वाजल्याची घटना घडली आहे. टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत असताना हे कसे घडले? हे जाणून घेऊयात.
खरंतर, जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ त्यांच्या राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले तेव्हा मैदान व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन राष्ट्रगीताऐवजी भारतीय राष्ट्रगीत वाजवले. व्हिडिओमध्ये भारत भाग्य विधाता ऐकू येते. तथापि, काही सेकंदातच भारतीय राष्ट्रगीत थांबवण्यात आले आणि ऑस्ट्रेलियन राष्ट्रगीत पुन्हा वाजवण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने शांततेत आपले राष्ट्रगीत पूर्ण केले. इथे कदाचित पीसीबीच्या एखाद्या कर्मचाऱ्याची चूक असावी ज्याने ऑस्ट्रेलियाऐवजी भारताचे राष्ट्रगीत वाजवले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. त्याची सुरुवात चांगली झाली आहे. त्याने १०० धावांपर्यंत २ बळी घेतले आहेत.









