जवळपास 8 वर्षांनी 19 फेब्रुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार, ‘या’ संघांमध्ये होणार मॅच, कुठे पाहता येणार Live?

0

जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं असून बुधवार 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यंदा स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जाणार असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमधील मैदानांवर खेळवली जाईल. टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जाणार आहेत. तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाहण्याचा आनंद फॅन्स कुठे घेऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात.

भारत कोणत्या ग्रुपमध्ये :

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघांचा सहभाग असून या संघांना 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया सह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड हे आहेत. प्रत्येक संघ ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येकी तीन सामने खेळतील. यातील प्रत्येक ग्रुपमध्ये टॉप दोनवर राहणारे संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील आणि सेमी फायनल जिंकणारे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी फायनलमध्ये लढतील.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना कोणामध्ये होणार?

बुधवार 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. दुपारी 2: 30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून कराची येथील नॅशनल बँक स्टेडियमवर हा सामना पार पडेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तीन वेळा आमने सामने आले आहेत. 2000, 2006 आणि 2009 या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात तीनही वेळा न्यूझीलंडनेच पाकिस्तानचा पराभव केलेला आहे. त्यामुळे याही सामन्यात यजमान पाकिस्तान पेक्षा न्यूझीलंडचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे भारताचे सामने कधी?

20 फेब्रुवारी : गुरुवार – भारत विरुद्ध बांगलादेश – ठिकाण : दुबई

23 फेब्रुवारी : रविवार – भारत विरुद्ध पाकिस्तान – ठिकाण : दुबई

2 मार्च : रविवार – भारत विरुद्ध न्यूझीलंड – ठिकाण : दुबई

कुठे पाहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हे सामानाने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवले जातील. तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पारपडेल.