“नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब…” नाराज पुणे शहर उपशहर प्रमुख आज ‘शिवधनुष्य’ हाती घेणार

0
1

पुणे शहर शिवसेना म्हटलं की शिवसेनेचा बालेकिल्ला आणि तळागाळापर्यंत बांधणी असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघ कायमच चर्चेत असतो. हिंदुहृद्यय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव साहेब ठाकरे व आदित्य ठाकरे या सर्वांनाच कायम प्रचंड साथ आणि सोबत देण्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा अग्रक्रम लागतो. पुणे शहर शिवसेनेमध्ये प्रचंड पडझड झाली असली तरी सुद्धा कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला म्हणावे तसे सक्रिय सभासद मिळत नव्हते… असंख्य प्रयत्न केल्यानंतरही कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकारणी जाहीर करण्यापर्यंत सुद्धा धाडस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला करता आले नाही. परंतु आज कोथरूड शिवसेनेमध्ये मोठे खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना (उबाठा) गटामध्ये सक्रिय असलेल्या आणि आदित्य ठाकरे यांची जवळीक असणारे शिवसेना पुणे शहर उप प्रमुख राजेश पळसकर यांनी पक्षातील नव्या प्रवृत्तीच्या विरोधात नाराजी व्यक्त करत जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेऊन आज हाती धनुष्यबाण बांधण्याचे निश्चित केले आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

अलीकडच्या काळात राजकीय महत्वकांक्षा मनात ठेऊन काही जनपक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे. सध्या संघटनेत हि संकल्पना काही नेते राबवीत आहेत ते माझ्या सारख्या शिवसैनिकाला न पटणारे आहे. त्यामुळे आज रोजी शिवसेना पक्षातील माझ्या उपशहर प्रमुख शिवसेना, पुणे शहर पदाचा राजीनामा देत आहे. असे जाहीर करताना त्यांनी नुकत्याच पुणे शहरात नव्याने जाहीर करण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांवरती ही आक्षेप घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विभिन्न पक्षांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांनी या पक्षात येऊन घेतलेली पदे कदाचित या नाराजीला कारणीभूत असू शकतात.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

राजेश पळसकर यांनी पाठवलेले राजीनामापत्र- 

एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करीत असताना वंदनीय मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन सन २००२ साली कॉलेज जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेचा सदस्य होऊन शिवसेना परिवारासोबत जोडलो गेलो. तेव्हापासून आजतागायत गेली २३ वर्षे पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कोणत्याही अपेक्षा व लालसा न करता प्रामाणिकपणे पार पाडत आलो. साम दाम दंड भेद या नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो.

मागून आलेले अनेक जन पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो. हे करताना पक्षाच्या आंदोलनाचे अनेक गंभीर गुन्हे देखील माझ्यावर दाखल होऊन अनेकदा तुरुंगवारी देखील झाली. आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकटकाळात देखील निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतू अलीकडच्या काळात राजकीय महत्वकांक्षा मनात ठेऊन काही जन पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे. सध्या संघटनेत हि संकल्पना काही नेते राबवीत आहेत ते माझ्या सारख्या शिवसैनिकाला न पटणारे आहे. त्यामुळे आज रोजी शिवसेना पक्षातील माझ्या उपशहर प्रमुख शिवसेना, पुणे शहर पदाचा राजीनामा देत आहे. तूर्तास इतकेच,

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

संघटनेमध्ये काम करीत असताना सर्व मान्यवर नेते, संपर्क प्रमुख, राज्यभरातील पदाधिकारी व शिवसैनिक यांचे कायमच मार्गदर्शन व सहकार्य मिळत गेले, त्यांचा मी कायमच ऋणी राहील धन्यवाद…