खासदार तथा नागरी विमान उड्डाण व सहकार मंत्री माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शिष्टाईला अखेर यश मीटरचा अवाजवी रुपये 500 दंड अखेर माफ करण्यात आला माननीय खासदार तथा नागरी विमान उड्डाण व सहकार मंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ साहेबांच्या सूचनेनुसार माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी सर्व रिक्षा संघटनांची आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग आयोजित केलेली होती, बेकायदेशीर चालणाऱ्या ओला उबर तसेच सीएनजी हायड्रो टेस्ट फी मनमानी पद्धतीने आकारणारे रेट्रो फिटर बेकायदेशीर रित्या पर जिल्ह्यात व परराज्यात बजाज फायनान्सने विकलेल्या 35 ते 40 हजार रिक्षा बाबतची यांच्या तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले.






त्याचप्रमाणे रिक्षा पासिंग साठी परवानाधारकांची सक्ती रद्द करण्यात यावी, मीटरची रोड टेस्ट रद्द करण्यात यावी, नवीन रिक्षा स्टॅन्ड ला मंजुरी देण्यात यावे व इतर रिक्षा व्यवसायातील अनेक अडचणींच्या वर चर्चा कलेक्टर साहेबांच्या समोर समर्थ सेवा रीक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद तांबे व इतर संघटनांच्या सर्व प्रतिनिधी सोबत करण्यात आली. जिल्हाधिकारी पुणे आरटीओ पुणे डेप्युटी आरटीओ पुणे यांनी एकमताने रिक्षा मीटर पासिंगचा दंड रद्द करण्यात यावा ही मागणी तातडीने मंजूर करण्यात आली.










