राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे व पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा निरीक्षक पदी सुरेश पालवे पाटील निवड झाल्याबद्दल सत्कार

0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड निरीक्षकपदी नुकतीच श्री. सुरेश पालवे पाटील यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांनी गुप्ते मंगल कार्यालय येथील शहर कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. शहराध्यक्ष म्हणून श्री.दीपक मानकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर पक्षवाढीसाठी महत्वाचे कार्यक्रम केले त्या सर्व बाबींचा समावेश असलेला कार्य अहवाल देखील त्यांना यावेळी देण्यात आला.

निरीक्षक श्री. सुरेश पालवे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांच्या पाठीशी आपण भक्कम उभे राहले पाहिजे. पुणे शहराचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माझा गेली २० ते ३० वर्षापासूनचा संपर्क आहे. विधान परिषद पदवीधर निवडणुकीत दीपक मानकर यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. गेली दोन वर्षांपासून शहराध्यक्ष दीपक मानकर आणि त्यांची पक्ष संघटनेतील पदाधिकारी हे पुणे शहरात खूप चांगल्याप्रकारे काम करीत असून राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री मा.ना. श्री.अजित दादा पवार यांचे हात अजून बळकट करीत आहात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची पूर्वतयारी करावी, सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, नव्याने करावयाची पदनियुक्ती करणे त्याचबरोबर कार्यकर्त्याला शासनाच्या विविध कमिटीवर काम करण्याची संधी दिली जाईल.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री मा.ना. श्री.अजित दादा पवार यांनी निरीक्षक श्री. सुरेश पालवे पाटील या अतिशय योग्य व्यक्तीची निवड केलेली. आहे. निरीक्षक श्री. सुरेश पालवे यांचे पुणे शहराशी जवळचे नाते असून तळागाळापर्यंत ते काम करतात. आदरणीय दादांची महाराष्ट्रासह पुण्यातील ताकद अजून वाढली पाहिजे. पुणे शहरातील कार्यकर्ते तळमळीने पक्षाचे काम करतात. त्यांना वेगवेगळ्या पदांची संधी मिळायला पाहिजे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणे शहरात एक नंबर असेल.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सदर प्रसंगी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर, उपाध्यक्ष दत्ता सागरे, पुणे शहर निरीक्षक रुहीसबा सय्यद, सरचिटणीस अर्चना चंदनशिवे,विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष जयदेव इसवे, सोशल मिडिया सेल अध्यक्ष शीतल मेदने, तृतीयपंथी सेल अध्यक्ष निर्जला गायकवाड, बँक कर्मचारी अध्यक्ष गिरीश मेंगे,महिला कोथरूड अध्यक्ष तेजल दुधाणे, कसबा अध्यक्ष सुप्रिया कांबळे, पुणे कँन्टोमेंट अध्यक्ष नीता गायकवाड, विधानसभा पर्वती कार्याध्यक्ष रामदास गाडे, पुणे कँन्टोमेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, शिवाजीनगर कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर,शाम शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता