शिंदेंचा पुण्यावर डोळा, पण ठाकरेंच्या शिलेदाराने थोपटले दंड! निवडणुकीआधी गळती रोखण्यासाठी घेतला मोठा निर्णय!

0

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याचं पहायला मिळत होतं. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला रिकाम्या हाती परतावं लागल्याने आता पुण्यात शिंदे गट अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने आता वसंत मोरे यांनी सुत्र हातात घेतली आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी गळती लागण्याची शक्यता असताना शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

उद्धव ठाकरे पुण्यातील शाखाप्रमुखांना भेटणार

पुण्याचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पुण्यातील शाखाप्रमुखांना भेटणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरे गटाला गळती लागली आहे. 5 माजी नगरसेवक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला होता.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

पुण्याची गळती रोखण्यासाठी वसंत मोरे अॅक्टिव

अशातच पुण्यातील ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याची चर्चा असताना संभाव्य फूट रोखण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत. महादेव बाबर यांच्यासोबतच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुण्याची गळती रोखण्यासाठी वसंत मोरे यांनी स्वत: पुढाकार घेतल्याचं पहायला मिळतंय. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

एकनाथ शिंदेंचे सुचक संकेत

दरम्यान, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असून मला कुणीही भेटू शकतो. मी कधीही कोणासोबतही दुजाभाव केलेला नाही. तुम्हाला आताच का शंका येत आहे? पुण्यात शिवसेना मजबूत असून आणखी मजबूत होणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सुचक संकेत दिले होते. त्यावर आता वसंत मोरे अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर