वारजे विकास कृती समितीच्या वतीने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपायुक्त मा. पटारे साहेब वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विश्वजीत कायंगडे वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. विक्रम मिसाळ यांच्यासोबत वारजे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करणे बाबत सविस्तर बैठक घेण्यात आली.
या बैठकीत वाहतुकीस अडथळा ठरणारे दुकानदार, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, टायरवाले, टेम्पो, रिक्षा, सहाआसनी रिक्षा स्टॅन्ड , अतिक्रमणे बेवारस वाहने यावर सखोल चर्चा करण्यात आली. वारजे वाहतुकीत काही प्रायोगिक बदल करणे, बेशिस्त वाहनचालक, नियम मोडणारे आणि वाहतुकीस अडथळा करणारे घटक यांच्यावर कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारणे आदी बाबींवर कृती समितीच्या वतीने सूचना करण्यात आल्या.
अशा अनेक व्यक्ती , व्यावसायिक यांना वाहतूक विभागाच्या वतीने नोटीसा काढण्यात आल्या आहेत. वारजे पोलीस स्टेशनचे वतीने सुद्धा वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
या बैठकीस मा. उपमहापौर दिलीपभाऊ बराटे ,मा.श्रीकृष्ण बराटे,मा.सतिशभाऊ बोडके मा.बाबा धुमाळ ,मा. किरण बारटक्के, मा कैलाश दांगट मा. सचिन दशरथ दांगट, मा. दत्तात्रय चौधरी, मा.सचिन बराटे,मा. निलेश घारे मा. यशवंत ठोकळ मा.दत्ता झंजे, मा. सचिन विष्णू दांगट ,मा. दत्ता पाखिरे, मा. विनायक लांबे मा. कैलास देवकर , मा.पराग ढेणे,मा. नाना सोनवणे, मा.सतीश पाटील, मा. निलेश आगळे,मा. रफिक शेख मा. निवृत्ती येनपुरे ,मा. राम बराटे मा. भावना पाटील, मा.वसंत कोळी यांचेसह अनेक सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.