साहित्यिक बाणा अन् करेक्ट कार्यक्रमाचे कलावंत; ध्येयवादी दिलीपभाऊ एक आदर्शवत ‘चैतन्यपीठ’च

•साहित्यिक कलावंतांची प्रेरणा •राजकारणातील समाज चेतना

0
1

नेतृत्वाने बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल करत नवनवीन ज्ञानाला अवगत करण्याची कला अवगत केली तेच नेतृत्व कायमच चिरतरुण आपलेसे वाटतं… याचं मूर्तीमंद उदाहरण म्हणजे वारजे भागातील ग्रामपंचायत ते आजपर्यंत पुणे महापालिकेत नेतृत्व दिलीप भाऊ बराटे. बदलत्या वारज्याचे ध्येय साध्य करत विकासाची वाटचाली या नेतृत्वाने अविरत सुरू ठेवली असून आपल्या नेतृत्वाला साहित्यिक जोड दिल्यामुळे बदलत्या जीवनशैलीतही हे नेतृत्व सर्वांना आपलेसे वाटू लागते. राजकीय परिस्थिती कशीही असली तरीसुद्धा गेली 25 वर्ष वारजेच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेत जनसामान्यांसाठी लढणारे स्वाभिमानी नेतृत्व आजही दिलीप भाऊंचं नाव घेतलं जातं. अशा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वटवृक्षरुपी नेतृत्वास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

पुणे शहराच्या पश्चिमेला शेती प्राधान्य भाग असलेल्या वारजे भागातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर शैक्षणिक प्रगती साधताना सामाजिक जाणिवेतून सुरू केलेला हा राजकीय प्रवास अविरत सुरू असून आजही नवनव्या बदलांमध्येही या नेतृत्वाने कायमच काळानुरूप बदल केले. त्याचीच प्रचिती म्हणून आजही विभिन्न प्रकारच्या प्रभाग रचना झाल्या तरी सुद्धा या नेतृत्वाला कायमच विजयश्री खेचण्यात यश मिळालं. पुण्यातील नामांकित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्रतिनिधी संधी मिळाल्यानंतर शैक्षणिक प्रगतीसाठी या नेतृत्वाने वारजेच्या ग्रामीण लेहेजा असलेल्या भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू केले. सुरुवातीचा खडतर प्रवास पार केल्यानंतर एका ठराविक टप्प्यावरती जमा झालेल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, पुणे या नावाने सांस्कृतिक प्रवासाला सुरुवात केली. सांस्कृतिक क्षेत्रात प्रवास सुरू झाल्यानंतर वारजे ग्रामपंचायत ते नगरसेवक (२००२,२००१७, २०२२, २०१७) सलग 20 वर्ष या नेतृत्वाच्या कलागुणांना वाव मिळत गेला आणि मिळालेल्या संधीचा कायमच या परिसराचा विकास करण्यासाठी उपयोग करण्याचा ध्यास दिलीप भाऊ यांनी घेतला आहे. २००२ मध्ये मिळालेलं पुणे मनपा उपमहापौर पद असो की २०१७ साली स्थायी समिती सदस्य किंवा विरोधी पक्षनेता, पुणे मनपा या सर्व पदांचा कायमच वापर वारजेच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आला आहे. त्यामुळेच सध्या बदलत्या वारजाचं चिरतरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

शैक्षणिक प्रगती बरोबरच क्रीडा क्षेत्रातही अमुल्य योगदान देण्यासाठी या नेतृत्वाची नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्था, पुणे येथे सचिव म्हणून नियुक्ती झाली आणि त्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत वारजे परिसरामध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये मुलांना चांगल्या संधी मिळण्यास सुरुवात झाली. विभिन्न क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःची एखादी संस्था असावी या उदात्त हेतूने दिलीपभाऊ बराटे यांनी संस्कार मंदिर या संस्थेची निर्मिती करून वारजे भागातील दिन दुबळ्या आणि गरीब लोकांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केल्यामुळे या परिसरातील शैक्षणिक प्रगती सहज साध्य करणे शक्य झाले. शैक्षणिक प्रगती पेक्षा सांस्कृतिक प्रगल्भता, विभिन्न क्षेत्रातील मान्यवर लोकांचे विचार समाजातील लोकांना दिशा देण्याचे काम करतात या उदात्तहेतुने सामान्य नागरिकांसाठी साहित्यिक-कलावंत प्रतिष्ठान, पुणे नावाची संस्था निर्माण करून रौप्य-महोत्सवी वर्षापर्यंत साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजनही या नेतृत्वाची अभिमानास्पद पातळी मानावी लागेल.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

दिलीप नावाचे गुणवैशिष्ट्य लक्षात घेतले तर दिलीप या शब्दाचा अर्थ राजा असा होते परंतु या नेतृत्वामध्ये राजापण असले तरी जनमानसात सहज आणि अत्यंत मनमिळावूपणे वागणारे नेतृत्व वारजे भागातील लोक त्यांना ओळखतात. दिलीप म्हणजे विकासाभिमुख, मजबूत, दूरदर्शी, साहसी, खर्चिक, स्वातंत्र्यप्रेमी, आणि आध्यात्मिक ही सर्व गुण लक्षणे वारजेतील दिलीप भाऊ यांच्यामध्ये तंतोतंत दिसतात. दिलीप हे नाव सामान्यतः स्वातंत्र्याच्या शोधात असतात मनाने आणि कृतीने खूप जलद असल्यामुळे आजूबाजूचे लोक उत्साही राहतात. दिलीपभाऊही नावाच्या प्रत्येक अक्षराच्या अर्थानुसार प्रत्यक्ष परिस्थिती आणि व्यावहारिक अन् काळजी घेणारे, संवेदनशील अन् दयाळू नेतृत्व म्हणून वारजे माळवाडी भागात उदयास आले आहे. आपल्या ज्ञानी आणि बौद्धिक कौशल्याच्या जोरावर साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान अन् संस्कार मंदिर दोन्ही संस्थांची वाटचाल प्रत्येकाला उत्साहवर्धकच वाटावी अशी वाटचाल करत आहेत.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

माननीय दिलीप भाऊ बराटे यांनी आजपर्यंत उपभोगलेली पदे-

• पुणे विद्यापीठ प्रतिनिधी, पुणे

• सदस्य वारजे ग्रामपंचायत

• सरपंच वारजे ग्रामपंचायत

• नगरसेवक – २००२,२०१७, २०२२, २०१७

• २००२ उपमहापौर, पुणे मनपा

• २०१४- खडकवासला विधानसभा उमेदवार

• २०१७- स्थायी समिती सदस्य, पुणे मनपा

• २०१९- विरोधी पक्षनेता, पुणे मनपा

• सचिव के. नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्था, पुणे

• संस्थापक अध्यक्ष-संस्कार मंदिर, पुणे