एक देश, एक निवडणूक ते शेतकरी योजना…; राष्ट्रपतींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?

0
1

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 4 एप्रिल या दोन टप्प्यात होणार आहे. सत्राचा पहिला भाग 13 फेब्रुवारीला संपेल आणि दुसरा भाग 10 मार्चपासून सुरू होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या भाषणात सरकारच्या कामगिरी बद्दल सांगितलं आहे. काय म्हणाल्या राष्ट्रपती जाणून घेऊया.

महाकुंभ दुर्घटनेबद्दल राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान निर्मात्यांन नमन केले. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभदरम्यान झालेल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली.

शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. सरकार गरीब आणि तरुणांसाठी काम करत आहे. केंद्र सरकारने रेल्वे क्षेत्रात केलेल्या कामाचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

एक देश एक निवडणुकीवर सरकार काम सुरु

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेत म्हणाल्या, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. देश वेगाने प्रगती करत आहे. शेतकरी आणि गरीब हे सरकारचे प्राधान्य राहिले आहे. सरकार एक देश, एक निवडणूक यावर काम करत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला शक्तीचा उल्लेख केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेत म्हणाल्या, महिला शक्ती बळकट करण्यासाठी सरकारही काम करत आहे. सरकारी योजनांमधून गरिबांना सन्मान मिळाला आहे. सरकारचा मंत्र सबका साथ, सबका विकास आहे. या सरकारमध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑलिम्पिकमध्ये मुली देशाला गौरव मिळवून देत आहेत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेत म्हणाल्या, आमच्या मुली ऑलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावत आहेत. देशातील तरुण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. गेल्या दशकात तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

मध्यमवर्गासाठी काम केले

राष्ट्रपती म्हणाले की, सरकारने नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना 50 टक्के पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सरकार कटिबद्ध आहे. रेरा कायदा झाला आणि लोकांना घरांसाठी अनुदान दिले जात आहे.

सरकारी योजनांच्या माध्यमातून देशातील गरिबांना सक्षम केले

राष्ट्रपती म्हणाल्या की, आज देशात मोठ्या निर्णयांची वेगाने अंमलबजावणी होताना दिसत आहे. या निर्णयांचा फायदा देशातील गरीब, महिला आणि वंचितांना झाला. सरकारने तीन कोटी कुटुंबांना घरे देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीएम स्वामीत्व योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटींहून अधिक ओनरशिप कार्ड देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधी आणि आयुष्मान योजनेअंतर्गत कोट्यवधी लोकांना मदत केली जात आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

सरकारने एमएसएमईसाठी कर्ज हमी योजना आणली

संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, एमएसएमईसाठी कर्ज हमी योजना आणि ई-कॉमर्स एक्सपोर्ट हब व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत. आज देशातील लघु उद्योगांनाही प्रगतीच्या समान संधी मिळत आहेत.

मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडिया

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, आज आपले तरुण स्टार्टअपपासून अंतराळापर्यंत देशाला गौरव मिळवून देत आहेत. गेल्या दशकात मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडिया योजनांच्या माध्यमातून तरुणांना अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज देशात लाखो स्टार्टअप्स आहेत.

एआयच्या क्षेत्रात भारत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, इंडिया एआय मिशन सुरू झाले आहे. एआय डिजिटल तंत्रज्ञानात भारत जगाला रस्ता दाखवत आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी सुरू झाली आहे. काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे.