आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही? आज संध्याकाळपर्यंत सांगा, अन्यथा..; मनोज जरांगे पाटलांचं मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

0
1

सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही हे त्यांनी सांगावं. अनेक लोक उपोषणाला बसले आहेत आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या देणार आहेत की नाही? हे सांगावं, म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. आज 5 दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतला नाही. आरक्षण देणार की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. किंबहुना मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यामुळे त्यांनी एक तर हो किंवा नाही म्हणून सांगा, म्हणजे आम्हाला पुढील दिशा ठरवाता येईल. असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल केले आहेत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

मुख्यमंत्र्यांना निर्णयासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ- मनोज जरांगे पाटील

आमच्या सोबत बेइमानी केली तर पाच वर्ष नीट सत्ता चालू देणार नाही. त्यामुळे सरकारने स्पष्ट सांगून टाकावे, आरक्षण देणार आहेत की नाही. मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळपर्यंत संगावे. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिले नाही तर तुम्हाला 5 वर्ष सुखाने सत्ता करू देणार नाहीत. त्यामुळे तोंड लपवू नका, मराठ्यांचा विरोधक कोण आहे हे आम्हाला कळणे गरजेचे आहे, असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज (29 जानेवारी )पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंतचा वेळ देत आपल्या मागण्यासाठीच्या निर्णयासंदर्भात परत एकदा अल्टीमेटम दिलाय.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

धनंजय देशमुखांचे एक दिवसीय उपोषण करत पाठिंबा

मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक दिवसाचे उपोषण करत पाठिंबा दिला आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला पन्नास दिवस उलटले असून कुटुंबाच्या वेदना कायम आहेत. पोलिसांचा तपास आपले काम मार्गी लावत असून त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. अजूनही कुटुंबाच्या वेदना तेवढ्याच कायम आहेत. आरोपी अटक होत आहेत, त्यामुळे तपासात आशेचा किरण आहे. तपासयंत्रणेचं रोज एक काम सुरू असून ते काम मार्गी लावत आहेत. शिवाय ते पण सतर्क आहेत. तपास ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मी व्यक्त होईल. असेही धनंजय देशमुख म्हणाले.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे