धनंजय मुंडेंचा बीड प्रकरणात काडीमात्र संबंध नाही, अंजली दमानियांनी आयुष्यभर…; अनिल पाटील यांची टीका

0
1

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आयुष्यभर केवळ राजीनामे मागत फिरल्या आहेत. त्यांनी राजीनामा मागितल्यानंतर कुणालाही काही टार्गेट करायचे आणि त्यांचा राजीनामा मागायचे, हे काही उचित वाटत नाही. तसेच धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात काडीमात्र संबंध येत नाही. राजकीय नेत्यांनी घडायचं तरी कसं आणि काम करायचं तरी कसं? असा सवाल करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी अंजली दमानियांवर टीका केली आहे. सोबतच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचीही अप्रत्यक्षपणे पाठराखण केल्याचे बोलले जात आहे.

ठीक आहे एखादा व्यक्ति जर दोषी असेल तर नक्की त्याला टाळलंही पाहिजे आणि त्याला मदतही नको झाली पाहिजे, मात्र या प्रकरणाबाबत धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत अचूक उत्तर दिली आहेत. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर नक्की कारवाई करावी. असे ही त्यांनी सांगितले आहे. मात्र असे असताना केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नसल्याचे ही अनिल पाटील म्हणाले.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

राऊत यांना विचारल्यानंतर कुठलाच पक्ष राहणार नाही अन् जुळणारही नाही

संजय राऊत ठाण्याजवळ राहतात. तर त्यांना ठाण्याजवळ पाठविण्याची गरज आहे. अजित पवार आणि शिंदे पक्षात फूट पडणार? अशा प्रकारचे कुठेतरी वक्तव्य करायचे. पण अशी कुठलीही गोष्ट राज्यात होणार नाही. राऊत यांच्या सांगण्यावरून आणि राऊत यांना विचारल्यानंतर कुठलाच पक्ष राहणार पण नाही आणि कुठलाच पक्ष जुळणार पण नाही. अशी प्रतिक्रिया देत अनिल पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या दाव्याला उत्तर दिलं आहे.

दरम्यान, नाशिक, रायगड पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविलेला होता. पण राज्याच्या दृष्टिकोनातून अशा गोष्टी वारंवार होणे उचित वाटत नाही. दरम्यान हाही प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरात लवकर सोडवतील. पण पालकमंत्री नसेल तर त्या जिल्ह्याचे आराखडे कसे सादर होतील? हा ही प्रश्न जनतेसमोर आहे. अशी प्रतिक्रिया देत अनिल पाटील यांनी राज्यातील पालकमंत्री पदाबाबतच्या तिढा प्रकरणी दिली आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

आता तरी मनोज जरांगे यांनी हे उपोषण थांबवले पाहिजे- अनिल पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी कशासाठी उपोषण सुरू करावे? हाही आता मला प्रश्न पडला आहे. खरंतर राज्य सरकारने मागच्या पाच वर्षांमध्ये अनेक वेळा याबाबतीत निर्णय घेतलेल्या आहेत. मराठा समाजाच्या मागे सरकार उभे राहिले आहे आणि पुढे देखील उभे राहणार आहे. परंतु केवळ उपोषणाचा पडदा आपण पुढे उभा करायचा आणि उपोषण सुरू करायचे. मात्र, यामुळे मनोधैर्य खचत जाते. तरी देखील राज्य सरकार उभे राहील. आता तरी मनोज जरांगे यांनी कुठेतरी हे उपोषण थांबवले पाहिजे, असे ही माजी मंत्री आणि आमदार अनिल पाटील म्हणाले.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार