धनंजय मुंडे-छगन भुजबळ भेटीची पाच कारणं? ओबीसींच्या सभांमध्ये एकत्रही दिसण्याची शक्यता

0

मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे नाराजी बोलून दाखवणाऱ्या छगन भुजबळांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.विशेष म्हणजे भुजबळ परदेशातून माघारी परतले तरी त्यांच्याबाबत राष्ट्रवादीने किंवा भाजपने काहीही निर्णय घेतलेला नाही.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्याचं वातावरण तापलेलं आहे. या हत्येमागे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा हात असल्याचा आरोप आहे. मात्र सध्यातरी वाल्मिक खंडणीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीमध्ये आहे. यावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी संभाजीराजे छत्रपती, अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली. खुद्द सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंना सल्ला देत नैतिक जाणीवेतून राजीनामा द्यावा, असं म्हटलं होतं. मात्र धनंजय मुंडे राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. स्वतः अजित पवार त्यांच्यामागे ठामपणे उभे आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

एकीकडे भुजबळ स्वपक्षावर नाराज आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरुन राज्यात रान उठलेलं आहे. त्यांच्याशी संबंधित लोकांचे गैरव्यवहार चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे ते अडचणीत आहेत. दोन्ही ओबीसी नेते असे अडचणीत काळात एकमेकांची भेट घेत असतील तर राज्याच चर्चा होणारच. या भेटीमागे पाच कारणं असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

मुंडे-भुजबळ भेटीमागची पाच कारणं

१. राज्यात एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे निघत असताना दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचे ओबीसी नेत्यांच्या समर्थनासाठी मोर्चे निघत आहेत. या मोर्चाना भुजबळांनी पाठबळ द्यावं, यासाठी ही भेट असू शकते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

२. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे. तो धोका टाळावा आणि ओबीसी नेत्याला संरक्षण मिळावं, म्हणूनही ही भेट असू शकते.

३. दोन ओबीसी नेते एकत्र येऊ शकतात, त्यामुळे आमच्याबाबीत निर्णय घेताना विचार करा असा एक मेसेज स्वकीयांना किंबहूना सरकारला देण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

४. छगन भुजबळ हे स्वपक्षावर नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी धनंजय मुंडेंनी स्वतःवर घेतली असू शकते. त्यामुळे ही भेट होऊ शकते.

५. सर्वात महत्त्वाचं म्हणजे. एकीकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात असताना दुसरीकडे भुजबळांनी मुंडेंचं एकप्रकारे समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट असू शकते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

धनंजय मुंडें पोस्टमध्ये काय म्हणतात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब यांची आज मुंबईत सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अनेक वर्ष भुजबळ साहेबांनी मंत्री म्हणून काम केलेले असल्याने या खात्यातील कामकाजासंबंधी त्यांनी मार्गदर्शनही केले.