ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला समोर, काय घडलं सगळं सांगितलं, हा इशारा दिला..

0
10

Pराज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होतोय. जयकुमार गोरे या प्रकरणामुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. काल संजय राऊत यांनी नाव घेऊन, तसंच विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता ज्या महिलेला त्रास दिल्याचा आरोप आहे, ती महिला स्वत: माध्यमांसमोर आली आहे. जयकुमार गोरे यांनी आपल्याला फक्त फोटोच नाही नाही पाठवले, तर मला आणि माझ्या आईला शिव्याही दिल्या होत्या असं ती महिला म्हणाली आहे.

पीडित महिलेनं काय आरोप केले? 

पीडित महिलेनं सांगितलं की, 27 नोव्हेंबर 2016 मी FIR दाखल केला. तेव्हाही त्यांनी मला बदनाम करण्याचे कटकारस्थान केले. 2019 ला त्याने निवडून आल्यावर त्रास होत होता म्हणून, कोर्टाच्या चेंबरमध्ये मला दंडवत घातला आणि माफी मागितली. मला वाटलं आता हा सुधारला असून, आपल्याला त्रास देणार नाही. त्यामुळे मी केस मागे घेतली म्हणून तो सुटला. त्याला कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाही असं पीडित महिलेनं म्हटलं आहे. मी हे प्रकरण दाखल झाल्यापासून कधीच माध्यमांसमोर आले नाही. पण 25 जानेवारीला एक पत्र आलं, नंतर माझ्या नावाची एक FIR व्हायरल झाली. त्याचे कार्यकर्ते माझ्याबद्दल चर्चा करतात की, आम्ही दुबईला गेलो, याने मला पुण्यात फ्लॅट दिला, मुंबईत फ्लॅट दिला. त्यामुळे मी आता स्वत: उपोषणाला बसण्याचं ठरवलं, कारण हा माणूस कधीपर्यंत माझी अशी बदनामी करणार? असं पीडित महिलेनं मुलाखतीत म्हटलं.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

माझ्या नावाने व्हायरल होत असलेलं एक पत्र समोर आलं, ते मी दिलंच नव्हतं. पोलिसांनीही काही केलं नाही, माहिती घेतली नाही, उलट पोलीस मला विचारणा करण्यासाठी आले की, तुम्ही आंदोलनाला बसणार का वगैरे. मात्र, त्यानंतर मला अंदाज आला की, हा विषय त्यानं अजून सोडलेला नाही, आपली बदनामी अजून सुरू आहे. त्यामुळे मी 17 मार्चला उपोषणाला बसणार असल्याचं पत्र दिलं.

मी आता राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अजून काही लोकांना मी पत्र पाठवलं आहे. हा माणूस माझी आणखी किती बदनामी करणार? हा सवाल घेऊन मी आमरण उपोषण करणार असल्याचं या पीडित महिलेनं म्हटलं आहे. त्यानुसार 17 तारखेला आपण विधान भवनासमोरच उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

जयकुमार गोरे या प्रकरणावर काय म्हणाले?

जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचं म्हटलं आहे. तसंच एका युट्यूब चॅनलने दीड वर्षांपासून माझ्यावर टीका करण्याचं काम केल्याचं म्हटलं आहे. खालच्या पातळीवर जाऊन, माझ्यावर, पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम या चॅनलने केलं असं जयकुमार गोरे म्हणाले. विधानसभा सभागृहात जयकुमार गोरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. राजकीय वैमनस्यातून सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांनी हा गुन्हा दाखल केलाय. माझ्या वडिलांचं अस्थीविसर्जन करण्याचीही यांनी वाट पाहिली नाही, त्यापूर्वीच माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आणि सगळं नष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, हे म्हणतात आमच्याकडे पुरावे आहेत, तर तो न्यायालयाचा अवमान आहे असं जयकुमार गोरे म्हणाले. जयकुमार गोरे यांनी याप्रकरणी संजय राऊत आणि एका युट्यूबच्या संपादकाविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडला आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ