तेरा मेरा साथ और बन गई बात! बांधकाम व्यवसायिक आणि पुणे महापालिकेचे अधिकारी यांचं सध्या प्रशासक काळात मात्र हे आता खूप सुसाट चालू आहे. पुणे महापालिकेचे प्रशासकराज फक्त आणि फक्त व्यावसायिकांचा विचार करत नियम पायदळी तुडवण्याचा कळसच गाठण्याचा चंग बांधत आहेत की काय शंका निर्माण झाली आहे. कारणही तसेच आहे कोथरूडच्या डुक्करखिंडी भागाला लागत सुरू असलेले ११ मजली बांधकाम सुरुवातीपासूनच या बांधकामाच्या विरोधात असंख्य तक्रारी असतानाही संगणमताने त्याला मंजुरी देण्यात आली इमलेही बांधण्यात आले. मुळात तक्रारीमध्ये तथ्य असल्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर पुणे महापालिकेला प्रशासनाला जाग आली परंतु गेली दोन वर्ष संबंधित चुका पोटात घालण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्यामुळे कठोर निर्णय घेतल्यानंतरही संबंधित व्यावसायिकाने पुणे महापालिकेच्या वाटप आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत की काय हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.






पुणे महापालिकेचे नोंदणीकृत “आर्किटेक्ट” श्री. प्रकाश कुलकर्णी यांनी ‘दोडके प्लांझो’ व्यावसायिक आणि निवासी इमारत क्र. 71/10B1 (P) कोथरूड अधिकाऱ्यांशी अशा बेकायदेशीर मंजूरी आणि FSI मध्ये फसवणूक करून हेतुपुरस्सर मंजूर इमले बांधण्यात आले. मुळात राजकीय वरदहस्त आणि अधिकाऱ्यांशी संगणमत करत उभारण्यात आलेल्या या इमारतीबाबत असंख्य तक्रारी आल्या तरी त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे आज अखेरच्या टप्प्यात इमारतीचे काम असतानाच उच्च न्यायालयात याचिका दाखल होताच शासकीय अधिकाऱ्यांनी सध्या या कामाला स्टॉप वर्क दिल असले तरीही राजकीय वरद हस्ताच्या जीवावर आजही अंतर्गत कामे सुसाट सुरू आहेत.
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत FSI मध्ये चुकीच्या लाभासाठी भूखंड क्षेत्र मोजणीमध्ये हेतुपुरस्सर चुकीचे वर्णन करणे आणि फसवणूक करणे, बेकायदेशीर मंजुरी आणि “प्रकल्प” साठी मंजूर योजना रद्द करणे आणि अशा बेकायदेशीर कामांसाठी “वास्तुविशारद” “आर्किटेक्ट” श्री. प्रकाश कुलकर्णी, अंकुर असोसिएट्स आर्किटेक्ट्सचा परवाना निलंबित करण्यासाठी मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत असतानाही कोणतीही कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात आली नाही. कोथरूड सर्व्हे क्र. 71/10B1 (P), पुणे प्रारंभ क्रमांक CC/0235/21 दिनांक 06/05/21, CC/1838/22 दिनांक 18/10/22 अंतर्गत मंजूरीमुळे उक्त प्लॉटमधील बीडीपी लाईन्स आणि अशा झोनमुळे प्रभावित झालेले असून साइटवरील दोन्ही सेवा रस्त्यांची रुंदी अन् जागेवर महामार्गाची रुंदी प्रभावित झाले आहे.
संबंधित विकसकाने दिनांक 12/04/2022 च्या परिशिष्ट ‘F’ अंतर्गत प्लिंथ लेव्हलपर्यतचे काम पूर्ण झाल्याची सूचना आवक क्रमांक अंतर्गत “वास्तुविशारद” द्वारे सादर केली गेली. त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी सीमांकन, झोनिंग सीमांकन, आणि “विकासक” आणि “वास्तुविशारद” यांना मंजूरी देण्याची मागणी केली आहे. अन् फरक स्वीकारत सर्व्हिस रोड कमी झाल्याबद्दल “वास्तुविशारद” कडे स्पष्टीकरणाची मागणी केली आणि राष्ट्रीय महामार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडला प्रभावित करणाऱ्या परिमाणांमधील फरक लक्षात घेत चुकीचे वर्णन केल्याबद्दल “वास्तुविशारद”कडे परवाना निलंबित करण्यासह स्पष्टीकरणाची मागणी केली. बांधकाम क्षेत्राची आवश्यक फॉर्मेटमध्ये गणना करण्यात अयशस्वी ठरले आहे.
सीसी क्र. CC/0235/21 खालीलप्रमाणे:
उत्तर बाजू 93.17 M जेथे प्रत्यक्षात 91.00 M आहे.
दक्षिण बाजू 113.18 M आहे जेथे प्रत्यक्षात 110.00 M आहे.
अधिकाऱ्यांनी सीसी क्रमांक 1838/22 दिनांक 18/10/2022 अंतर्गत भूखंड क्षेत्र आणि FSI मध्ये बदल न करता “विकासक” आणि “आर्किटेक्ट” सह संगनमताने सुधारित योजना मंजूर केली आणि परिमाणांमधील फरकांबद्दल अंतर्गत अहवालात त्यांच्या स्वतः च्या नोटिंगच्या उपस्थितीत बिंदू 9 मध्ये वर नमूद केल्याप्रमाणे. ही हेतुपुरस्सर फसवणूक आणि चुकीच्या FSI GAIN साठी चुकीचे वर्णन आहे जे युनिफाइड नियम, MRTP ACT अंतर्गत उल्लंघन केले आहे.
“आर्किटेक्ट” आणि “डेव्हलपर” द्वारे “अधिकारी” द्वारे संगनमताने चुकीचे सादरीकरण आणि फसवणूक बद्दल लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहेः
अ) सीसी क्रमांक ०२३५/२१ अंतर्गत दिनांक ०६/०५/२०२१ च्या मंजुरी योजनेनुसार, “आर्किटेक्ट” आणि “डेव्हलपर” द्वारे प्रस्तुत भूखंड क्षेत्र गणना 2900.00 चौ.मी. जेव्हा प्लॉटच्या चार बाजूंचे परिमाण 37.38 M, 93.17 M, 24.01 M आणि 113.18 M असतात. इमारतीची लांबी 85.85 M आणि 17.48 M 6.00 M मार्जिनसह आहे.
व) पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत अहवालानुसार भूखंडांचे परिमाण कमी झाले आहेत आणि त्यामुळे भूखंडाच्या घटलेल्या परिमाणांच्या प्रमाणात भूखंड क्षेत्र मोजणी कमी करावी.
क) सीसी क्रमांक ०२३५/२१ अंतर्गत 37.38 मी. 93.17 मी. 24.01 मी आणि 113.18 मी दिनांक ०६/०५/२०२१ हे प्लॉटच्या चार बाजूंचे परिमाण 37.00 मी., 90.00 मी., 24.00 मी. आणि 110.00 मी. मध्ये बदलले आहेत. सीसी क्र. अंतर्गत दिनांक १८/१०/२०२२ रोजी मंजूर. १८३८/२२. हे लक्षात घेण्यासारखे आहे की परिमाण कमी झाले आहेत परंतु कमी केलेल्या परिमाणांमधील प्लॉट क्षेत्राची गणना हेतुपुरस्सर बदललेली नाही आणि एफएसआयच्या चुकीच्या वाढीसाठी सीसी क्रमांक 0235/21 प्रमाणेच राहिली आहे.
अर्जदार आणि वास्तुविशारद प्रकाश कुलकर्णी यांनी वरील आणि बेकायदेशीरपणा आणि चुकीचे सादरीकरण केल्याच्या संदर्भात मटेरियल चुकीचे सादरीकरण केल्यामुळे आम्ही परवानगी रद्द करण्यासाठी वारंवार पुणे महापालिकेकडे आवाहन करण्यात आले असले तरीसुद्धा कोणतेही कारवाई करण्यात न आल्याने तक्रारदाराने थेट उच्च न्यायालयात आवाहन दिले परंतु त्यानंतर ही पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या व्यावसायिकाशी सलगी मात्र कायमच ठेवली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 258 अन्वये आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम आणि विकास नियंत्रण नियमांच्या कलम आणि नियमांनुसार कारवाई करण्याची मागणी केली जात असतानाही आजही तीन वर्षांपूर्वीच्याच कारणांसाठी खुलासा मागवत काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित व्यावसायिकाला मदत करण्यासाठी न्यायालयीन कारण देत अधिकाऱ्यांनी कोणतेही कागदपत्र जाहीर करण्यास नकार दिला आहे तर याचाच फायदा घेत सध्या बांधकामावरती सुसाट कामे सुरू आहेत.
विकास आराखड्यातील मुख्य रस्ता बाधित होत असतानाही चिडीचूप झालेल्या अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीचा वापरही व्यावसायिकाच्या हितासाठीच करायचा आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतरही संबंधित व्यावसायिकांशी पत्र व्यवहार पुन्हा त्याच मुद्द्यांवरती केला जात असून यामध्ये फक्त आणि फक्त व्यावसायिक हितच महापालिकेला महत्वाचे वाटत आहे. आपले लागेसंबंध उघड न होण्यासाठी ‘न्यायप्रविष्ट’ या शब्दाचा शस्त्र म्हणून वापर अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.











