अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्याच्या तोंडी; वैकुंठ स्मशानभूमीत घटनेच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ

0

नवी पेठेतील वैंकूठ स्मशानभूमीत भटक्या कुत्र्याने अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून एकच खळबळ उडाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीत जाऊन याची खातरजमा केली. यावेळी हे मांसाचे तुकडे नसून, पाव असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पण वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेह पूर्ण जळेपर्यंत ठेकेदाराचे कर्मचारी थांबत नसल्याने तेथे कुत्र्यांचा वावर वाढला आहे हा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.

आज (ता. ८) सकाळी काही नागरिक अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीत असता, तेथे त्यांना भटकी कुत्री जळालेल्या मृतदेहाच्या जवळ काहीतरी खात असल्याचे दिसून आले. नागरिकांची त्याचा व्हिडिओ काढला, तसेच या कुत्र्याला तेथून हाकलून दिले. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दरम्यान वैकुंठ स्मशानभूमीत भटके कुत्रे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडून मांस खात असल्याचे सांगत व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर यांनी वैकुंठ स्मशानभूमीत जाऊन पाहणी केली.

मनिषा शेकटकर म्हणाल्या, ‘नागरिकांची तक्रार आल्यानंतर तेथे पाहणी केली. राख सावडण्यासाठी नागरिकांनी नैवेद्य म्हणून पाव व नारळ ठेवले होते, ते जळालेला पाव कुत्रे खात आहेत. अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे नाहीत.