हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्या नात्यात काहीतरी गडबड असल्याचं गेल्या काही दिवसांपासून समोर येत होते. या ना त्या कारणाने दोघंही चर्चेत होते. पण दोघांनीही याबाबत स्पष्ट काही बोललं नाही. त्यामुळे या बातम्यांना काही अंशी बळही मिळत होतं. पण नताशाच्या इंस्टाग्राम फोटोनंतर या फक्त अफवा होत्या असंच आता वाटू लागलं आहे. कारण नताशाच्या इंस्टाग्रामवर हार्दिकसोबतचे फोटो पुन्हा एकदा दिसू लागले आहे. मागच्या काही दिवसात हे फोटो दिसत नव्हते त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेसाठी हे एक कारण ठरलं होतं. इतकंच काय तर लग्नाचे फोटोही इंस्टाग्राम प्रोफाईलवर दिसत नव्हते. पण आता फोटो दिसत असल्याने या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं सांगितलं जात आहे. नताशाच्या अशा वागण्याने सोशल मीडियावर आता वेगळीच चर्चा रंगली आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील संबंध सुधारले आहेत का? की दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता? की हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता का? असे एक ना अनेक प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत. नताशाच्या फोटोखालीत त्यांनी या प्रश्नांचा भडीमार सुरु केला आहे. हार्दिक पांड्याचा आयपीएलमधील खराब फॉर्म आणि त्याआधी स्टेडियमवर त्याच्यावर होत असलेल्या टीकेवरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व नियोजन आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नताशा स्टेन्कोविकने सर्वात आधी आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरन पांड्या हे आडनाव काढलं. त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर हार्दिक पांड्यासोबतचे फोटो दिसत नसल्याने यांच्यात काहीतरी बिनसल्याचं चर्चा रंगली. सोशल मीडियावर सक्रिय असलेलं हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून एकही फोटो पोस्ट करत नव्हते. त्यात हार्दिक पांड्याकडे मुंबईचं कर्णधारपद असूनही नताशा सामना पाहण्यास आली नाही. दुसरीकडे 4 मार्चला नताशाचा बर्थडे होता मात्र हार्दिक त्याबाबत एकही पोस्ट केली नाही. अगस्त्यसोबतची पोस्ट वगळता नताशाने तिच्या आणि हार्दिकच्या सर्व पोस्ट काढून टाकल्या होत्या.
हार्दिक पांड्या आणि नताशाने 31 मे 2020 रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर जुलै 2020 मध्ये बाळाचा जन्म झाला आणि त्याचं नाव अगस्त्य ठेवलं. गेल्या वर्षी 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांनी रितीनुसार पुन्हा एकदा लग्न केलं होतं.