एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोलापूर मतदारसंघात 2 टर्मपासून भाजपनं बाजी मारली. एकीकडे तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्रिक करणाऱ्याच्या तयारीने भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर दुसरीकडे दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रसकडून जोरदार ताकद या मतदारसंघात लावण्यात आली. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन विद्यमान तरुण आमदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेय. महायुतीकडून भाजपचे आमदार राम सातपुते तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदार संघ अनुसुचित जाती (SC) साठी राखीव आहे.






सोलापुरात 59.19 टक्के मतदान झाले. गतवेळी 58.57 टक्के मतदार झालेय. गतवेळपेक्षा यंदा 0.62 टक्के जास्त मतदान झालेय, पण हे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडणार, याकडे सोलापुरकारांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोलापुरात तिरंगी लढत होती. काँग्रेस, भाजपसह वचिंतनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. 2019 मध्ये वचिंत आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, पण त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. यंदा मात्र प्रकास आंबेडकर यांनी वचिंतकडून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले होतं. मात्र, गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यामुळे वचिंतने अपक्ष उमेदवार अतिष बनसोड यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांची जादू म्हणावी तितकी चालली नसल्याचे दिसत असल्याने खरी लढत प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यातच झाली.
घटलेल्या मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर?
2024 सोलापूर विधानसभानिहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे
मोहोळ 63.15, सोलापूर शहर उत्तर 59.15, सोलापूर शहर मध्य 56.51, अक्कलकोट 59.17, सोलापूर दक्षिण 58.28, पंढरपूर 59.04 मतदान झाले, असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी 59.19 टक्के झाली आहे.
सभा आणि प्रचाराचा परिणाम मतदारांवर
महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदेना उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने सुरुवातीला त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. प्रणिती शिंदे यांनी गावागावात जाऊन कॉर्नर बैठका आणि लोकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. प्रणिती शिंदेंसाठी राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या सभा झाल्या. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. उद्धव ठाकरेंच्या सभेत मुस्लिम समजाची गर्दी लक्षणीय होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर ठाकरेंची सभा झाली होती. या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलं. तर महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी दिग्गज नेत्यांच्या सभांवर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इत्यादी नेत्यांच्या सभा राम सातपुतेंच्या प्रचारार्थ पार पडल्या. या सर्व सभा आणि प्रचाराचा परिणाम मतदारांवर नक्कीच होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह सोलापुरातील पाणी प्रश्न, उद्योग धंद्याचा प्रश्न, सोलापुरातील बेरोजगारी हे मुद्दे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. तर भाजपने ही निवडणूक राष्ट्रीय मुद्याकडे देखील वळवण्याचा प्रयत्न केला. धार्मिक धुर्वीकरणाचे राजकारण देखील यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. या सर्व बाबींचा थेट परिणाम निकालावर होणार आहे.
सोलापूरमध्ये सहा पैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार
सोलापूर लोकसभा मतदार संघात अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाचा समावेश होतो. यातील अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मोहोळ येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. सोलापूर मध्य या मतदारसंघात एकमेव काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत. या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 30 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 10 लाख 41 हजार 470 पुरुष मतदार, 9 लाख 88 हजार 450 स्त्री मतदार व 199 तृतीयपंथी मतदार आहेत.
अक्कलकोट – सचिन कल्याण शेट्टी
उत्तर सोलापूर – विजयकुमार देशमुख
सोलापूर मध्य – प्रणिती शिंदे
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मोहोळ – यशवंत माने
पंढरपूर-मंगळवेढा – समाधान आवताडे
2019 लोकसभेत त्रिशंकू लढत – sushil kumar shinde 2019 election result –
2019 ची निवडणूक ही अनेक अर्थानी महत्वपूर्ण होती. सुशीलकुमार शिंदे सारख्या दिग्गज नेत्यासमोर भाजपने विद्यमान खासदारचा पत्ता कट करून अध्यात्मिक गुरु असलेल्या आणि ज्यांचा राजकारनाशी कसलाच संबंध नाही अशा डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवलेलं होतं. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच मतदारसंघात शड्डू ठोकला होता. प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारानी राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली. सुशीलकुमार शिंदेचा सुमारे दीड लाख मतांनी डॉ. जयसिद्धेश्वर यांनी पराभव केला.
कुणाला किती मतं मिळाली ?
डॉ. जयसिद्धेश्वर – 5,24,985 मतं
सुशील कुमार शिंदे 3,66,377 मतं
प्रकाश आंबेडकर – 1,70,007 मतं











