पुणे क्राईम सिटी? …म्हणून आरोपी अन् गुन्हेगार यांच्याकडून पुण्याचीच निवड? ही आहे धक्कादायक कारणे

0
1

राज्यातील विविध ठिकाणांसह देशभरातील विविध गुन्ह्याशी निगडीत आरोपी दडण्यासाठी पुणेच निवडत असल्याचं मागील कालावधीतील काही घटनांवरून दिसून येत आहे. मात्र पुण्याचीच निवड का?याबाबत जर विचार करायचा झाला तर शहरात सातत्याने वाढत असलेली लोकसंख्या, झालेला विस्तार, बड्या व्यक्तींची कायम येजा असल्याने त्यांच्याकडून मिळणारा आश्रय देखील आहेच.

याशिवाय सर्व ठिकाणांहून माणसं वास्तव्यास आलेली असल्याने ओळख न पटण्याची जास्त शक्यता, शिवाय शहराच्या बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असणारे अनेक मार्ग अन् इतर शहरांशी असलेला कनेक्ट, लपण्यासाठी सोयीची असणारे ठिकाणं व संपर्काच्यादृष्टीनेही सहज असं शहर पुणे आढळून येते.

राज्यभर गाजत असलेलं बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देखील पुण्याचा संबध येत आहे. या गुन्‍ह्यातील आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांकडून बालेवाडी परिसरातून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर यापूर्वी फरार असलेला वाल्मीक कराड 31 डिसेंबरला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मुख्यालयात हजर झाला आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

पुणे, मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) 2023मध्ये कोंढव्यातून अटक केली होती. ते दहशतवादी देखील अनेक दिवसांपासून पुण्यात होते. बेकायदेशीररीत्या थेऊर परिसरात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे राहात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुण्यात लपण्याची कारणे –

वाढलेले शहर – गेल्या काही वर्षांत पुण्याची झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असून ते दूरपर्यंत पसरत आहे. त्यामुळे मध्य भागापासून उपनगरांत आरोपींना लपण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

ओळख पटत नाही – दुसऱ्या शहरातील किंवा राज्यातील गुन्हेगार असेल तर त्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसते. तसेच त्याचा चेहरा देखील ओळखीचा नसतो. त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेला शहरात गेलो तर आपण ओळखू येणार नाही, अशी शक्कल आरोपी लढवतात.

अनेक नेत्यांची पुण्यात घरे – राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना पुण्यात राजाश्रय मिळतो. कारण राज्यातील अनेक नेत्यांची पुण्यात घरे आहेत. त्या घरात किंवा त्या घराच्या परिसरात अशा आरोपींना आश्रय दिला जातो. तेथे त्यांना पुरेसे संरक्षण देखील मिळते.

इतर शहरांशी चांगला कनेक्ट – पुण्यापासून राज्यातील काही महत्त्वाची शहरे जवळ आहे. मुंबई, नाशिक, सातारा यांचा त्यात प्रामुख्याने सहभाग आहे. त्यामुळे येथे असुरक्षित वाटू लागले तर ते लवकर इतर शहरात जाऊ शकतात.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

संपर्काची साधणे – फरार झालेल्या आरोपींचा पोलिस सातत्याने माग काढत असतात. त्यामुळे पोलिस तांत्रिक तपासावर भर देतात. यातून सुटका होण्यासाठी भेटून किंवा चिट्टी पाठवून संपर्क साधला जातो. पुण्यातून अशा प्रकारचा संपर्क साधणे सोपे होते. कारण त्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा येथे आहेत.

शहरातील लोकसंख्या मोठी आहे. अनेक आरोपी हे पुण्यात त्यांचे मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडे राहतात. आरोपींचा शोध घेण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन होते. मात्र त्यात हॉटेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणांची तपासणी होते. खात्रीलायक माहिती असल्याशिवाय आरोपींचा कोणाच्या घरात शोध घेतला जात नाही. त्याचा गुन्हेगार फायदा घेत असतात. त्यामुळे पुण्यात लपण्यासाठी येणाऱ्या आरोपींची संख्या मोठी आहे. अशी प्रतिक्रिया शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.