आळंदीत सन्मानात जिरेटोप हाती घेत नमन अन् परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, …..मी महाराजांचा मावळाच

0

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी, राष्ट्रवादीचे नाराज आमदार छगन भुजबळ हेही उपस्थित होते. येथील कार्यक्रमात सावित्रीमाई यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेशही दिले आहेत. त्यानंतर, फडणवीसांनी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी, येथील संत, महात्म्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्वामी गोविंद गिरी महाराज व तेथील संतांनी छत्रपती शिवाजी महारांज परिधान करत असलेल्या सम जिरेटोप देऊन डोक्यावर परिधान करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. मात्र, छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे नकार दिला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

छत्रपती शिवरायांचा आदर ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास नकार देत आपण शिवरायांचा मावळा असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे जिरेटोप डोक्याला लावत फडणवीसांनी तो संतांकडे परत केला. मान्यवरांनी आग्रह केल्यानंतरही फडणवीसांनी विनंतीपूर्वक नकार दिला. तसेच, आपण छत्रपतींच्या मावळ्या समान असल्याची प्रतिक्रिया देत जिरेटोप परिधान न करता त्याला नमन केल्याचं पाहायला मिळालं. सध्या आळंदीच्या समाधीस्थळ परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून देवेंद्र फडणवीसांचे कौतूक होत आहे. कर्माने व्यक्ती मोठा होतो आणि महानदेखील होतो. हे सिद्ध करण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा सेवक, असे म्हणत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं जात आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता