एव्हरेस्ट थट्टा नाही, तिथं मृतदेहांचा खच पडलाय… ; प्रत्यक्षदर्शी भारतीय गिर्यारोहकानं सांगितलेला शब्दन् शब्द धडकी भरवणारा

0
1

ट्रेकिंगची आवड असणाऱ्या अनेकांसाठीच काही ट्रेक, काही डोंगर, पर्वतरांगा हे मैलाचे दगड ठरतात. मजल दरमजल गाठत ही ट्रेकर मंडळी सरतेशेवटी एव्हरेस्ट नावाच्या महाभयंकर आणि अनेकांसाठीच अशक्य असणाऱ्या जगातील सर्वाधिक उंचीच्या हिमशिखरावर चढाई करण्याची मोहिम अनेकजण हाती घेतात. कित्येकांना हे आव्हान फार सोपं वाटतं. पण, खरी परिस्थिती मात्र तिथं प्रत्यक्षात पोहोचल्यावरच लक्षात येते. हरियाणातील गिर्यारोहत नरेंद्र सिंह यादव यांनीही एव्हरेस्टचं काहीसं असंच वर्णन केलं आहे.

PTI नं त्यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, एव्हरेस्टची आणि त्याच्या प्रत्यक्ष रुपाची उंची या व्हिडीओतून लक्षात येते. 25 डिसेंबर रोजी यादव यांनी अंटार्क्टीकातील सर्वात उंच विंसम मॅसिफ शिखर सर करत विक्रमी कामगिरी केली. या क्षणी शिखरावरील तापमान होतं -52°C. आपल्या गिर्यारोहणाच्या आणि जगातील 7 सर्वात उंच शिखरं सर करण्याचा विक्रम करणाऱ्या यादव यांनी हा अनुभव नुकताच सर्वांसमोर आणला.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

जगातील सर्वात उंच शिखरावर चढाई करणाऱ्यांना हे शिखर त्याचं कणखर आणि रौद्र रुप दाखवतं तेव्हातेव्हा अनेकांचा शेवट त्याच शिखरावर होतो हे वास्तव नाकारता येणार नाही. विज्ञान, तंत्रज्ञानही या शिखरापुढे फिकं पडतं. हिमालय पर्वतरांगेतील या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची 8848.86 मीटर इतकी असून ते नेपाळ- चीनच्या सीमाभागात हा पर्वत उभा आहे. नेपाळमध्ये सागरमाथा अशी त्याची ओळख, तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा नावानं त्याला ओळखतात.