मोठी बातमी ! ख्रिसमसच्या सणादिवशी कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्रकिनारी भीषण स्फोट

0

कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये विमानाला अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ हे विमान क्रॅश झाल्यानंतर स्फोट झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगसाठी सूचना केली होती. मात्र, पुढे काय झालं हे अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान, विमान क्रॅश झाल्याने मोठी जिवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ख्रिसमसच्या सणादिवशीच हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजरबाईजन एरलाईनचं हे विमान असून या विमानातून 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

कझाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालायने याबाबत माहिती देताना सांगितले की, विमान दुर्घटनेच्या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाची पोहोचली आहे. सध्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असून प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत काही जण सुदैवाने बचावले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

रशियातील चेचन्या येथून भरले होते उड्डाण

रुसी न्यूज एजन्सीनुसार, अजरबैजान एयरलाईन्सच्या ह्या विमानाने रशियाच्या चेचन्या येथील बाकूमधून ग्रोज्नीसाठी उड्डाण भरले होते. ग्रोज्नीमध्ये धुके पडल्याने या विमानाने प्रवासी मार्ग बदलला होता. दरम्यान, अद्याप अजरबैजान एयरलाइंसने या दुर्घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.