छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या मुळशी तालुक्यात असंख्य गोष्टीमुळे चर्चा झाली असली तरी या दऱ्याखोऱ्यामध्ये ‘सरस्वतीच लेणं’ गोरगरीब वंचित आणि गरजवंत उंबरठ्यावर जर कोणी पोचवलं असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल (सदाफूली किंवा निळफुली) चेच नाव घ्यावे लागते. पेरीविंकल ही एक आकर्षक आणि उपयुक्त वनस्पती तिच्या निळसर, जांभळट, गुलाबी किंवा पांढऱ्या छटां प्रमाणे आज तालुक्यात विविध कानाकोपऱ्यामध्ये उभ्या असलेल्या शैक्षणिक संस्था आणि त्या नावारूपाला येण्यासाठी एक तप तपस्वी वृत्तीने समर्पक काम करणाऱ्या संस्थापक राजेंद्र बांदल यांचे कार्य अनमोल आहे. सडाफूली जेवढी आकर्षक त्याप्रमाणेच विंका अल्कलॉइड्स रसायनामुळे मधुमेह, रक्तदाब कर्करोग आणि इतर आजारांवरही पारंपरिक औषधांमध्ये बहुगुणी वापर केला जातो त्याप्रमाणेच चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या मुळशी तालुक्यातील दऱ्याखोऱ्यांमध्ये असलेल्या या शैक्षणिक सदाफूलीचाही आज असंख्य उंबरठ्यावरती सडा पडला असून ही निळफुली विकसित मुळशीच्या दारातील बागांमध्ये अभिमानाने डोलण्यामध्ये संस्थापक राजाभाऊंच योगदान मोलाच आहे.
पुण्याचे पश्चिम द्वार असलेल्या मुळशी तालुक्यातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. सामाजिक व सांस्कृतिक जाणीव वाढवणे. आधुनिक शिक्षणासोबतच पारंपरिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या वतीने पेरीविंकल या साजेशा नावाने शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. शैक्षणिक कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. सामाजिक कार्य याची जाणीव आणि संवेदना बालवयातच होण्यासाठी पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक उपक्रम रबवत चैतन्य विद्या प्रतिष्ठान ने समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीची संधी देण्याचे अनमोल कार्य अविरत करत आहेत.
चैतन्य विद्या प्रतिष्ठान चे संस्थापक राजेंद्र बांदल हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपले जीवन समर्पित केले असून, ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने त्यांनी ही संस्था स्थापन केली. अविरत एक तपपुर्तीपर्यंत फक्त आणि फक्त शैक्षणिक प्रचार प्रसार करण्यावर भर देत आज चैतन्य विद्या प्रतिष्ठान मुळशीच्या दऱ्याखोऱ्यात सदाफुलीचा गंध दरवळण्यामध्ये मोठे योगदान आहे. राजेंद्र बांदल यांची व्यक्तिमत्व म्हणून काही वैशिष्ट्ये:-
दृष्टीकोन: शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करणे.
समर्पण: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे.
नेतृत्व: त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने विविध शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत.
आवड: शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक जाणीवा निर्माण करण्यावर त्यांचा भर असतो.
विनम्र: वाचनाने येणारी प्रगल्भता याचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्व विनम्र याची जाणीव संस्थापकांच्या संपर्कात होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली चैतन्य विद्या प्रतिष्ठानने अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले असून, त्यांचा प्रयत्न शिक्षणाची गोडी लावण्याचा आणि समाजाच्या प्रगतीचा आहे. राजेंद्र बांदल यांनी चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
शैक्षणिक संस्था स्थापना
पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. शिक्षक दिन, विज्ञान दिन, आणि शिवजयंती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन दिले जाते. सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम, विद्यार्थी विकास, नेतृत्व आणि व्यवस्थापन यासाठी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल आणि संस्थापिका सौ. रेखा बांदल यांच्या नेतृत्वाखाली पेरीविंकलच्या सर्व शाखांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. राजेंद्र बांदल यांच्या या कार्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहेत आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व संस्कार मिळत आहेत. राजेंद्र बांदल यांची सामाजिक पार्श्वभूमी अत्यंत प्रेरणादायी आहे. ग्रामीण व शहरी समाजाच्या समस्यांची जाणीव ठेवून त्या सोडवण्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची पार्श्वभूमी शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामीण विकासाशी जोडलेली आहे.
राजेंद्र बांदल यांची सामाजिक पार्श्वभूमी:
ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार:
राजेंद्र बांदल यांनी ग्रामीण भागातील शिक्षणातील असमानता ओळखली आणि तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना सशक्त बनवण्याचा उद्देश ठेवलाय.
सामाजिक कार्य:
महिलांचे सक्षमीकरण, मुलींच्या शिक्षणावर भर, आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठीही उपक्रम राबवले आहेत.
समाज सुधारक दृष्टिकोन:
शिक्षणाबरोबरच आरोग्य, स्वच्छता, आणि रोजगार निर्मिती यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सामाजिक समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचा त्यांचा ध्यास आहे.
प्रेरणा आणि उद्दिष्टे:
राजेंद्र बांदल यांची भूमिका केवळ शैक्षणिक संस्थापक म्हणून मर्यादित नसून, त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांच्या कार्यातून समाजात शिक्षण, विकास आणि परिवर्तन घडवण्याची दृष्टी स्पष्टपणे दिसते. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी हिमालय नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली त्या माध्यमातून हजारो उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास आर्थिक मदत करून लाखो रोजगार निर्मिती केली आहे. संस्थेचे हे 28 वे वर्ष असून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पणे संस्था चालू आहे.