राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!

0
1

टी-20 विश्वचषक संपल्यानंतर राहुल द्रविड यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. लवकरच टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. भारताने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. त्यानंतर आता भारत विरुद्ध झिम्बाव्वे यांच्यात नवी मालिका 6 जुलैपासून चालू होणार आहे. असे असताना टीम इंडियाच्या नव्या प्रमुख प्रशिक्षकाच्या निवडीवर प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाला नवा प्रशिक्षक कधी मिळणार?

राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता भारतीय संघाला नवा प्रशिक्षक कोण मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रशिक्षकपदासाठी अनेक नेत्यांची नावं घेतली जात आहेत. लवकरच नव्या प्रशिक्षकाची निवड केली जाणार आहे. यावर जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकाची लवकरच निवड केली जाईल, असे शाह यांनी सांगितले आहे. याबाबत पीटीआयने सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार आगामी काळात भारत आणि श्रीलंका यांच्यात एक सिरीज होणार आहे. ही सिरिज चालू होण्याआधी भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल, असे जय शाह यांनी सांगितले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. या मालिकेची सुरुवात 27 जुलै रोजी होणार आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

या दोन नावांची होतेय चर्चा

माध्यमातील वेगवेगळ्या वृत्तांनुसार बीसीसीआयकडून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आमि वूरकेरी रमन यांची मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड केली जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाला श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी प्रमुख प्रशिक्षकाच्या रुपात कोण मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

2021 सालापासून राहुल द्रविड प्रशिक्षक

राहुल द्रविड नोव्हेबर 2021 मध्ये टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक झाले होते. द्रविड यांच्याआधी भारताचे माजी वेगवान गोलंदाज रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताने अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं आणि 17 वर्षांनी टी-20 विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य