टी 20I वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, ‘या‘ खेळाडूकडे मोठी जबाबदारी

0
1

भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी अंडर 19 वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समितीने मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर 3 खेळाडूंना राखीव म्हणून संधी देण्यात आली आहे. निकी प्रसाद भारतीय अंडर 19 महिला संघाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर सानिका चाळके हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. वूमन्स टीम इंडियाने रविवारी 22 डिसेंबरला बांगलादेशचा धुव्वा उडवत पहिल्यावहिल्या अंडर 19 आशिया कपवर नाव कोरलं. त्यामुळे आता या महिला ब्रिगेडकडून आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

स्पर्धेबाबत थोडक्यात पण महत्त्वाचं

या वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडियासह विंडीज, यजमान मलेशिया आणि श्रीलंका हे 4 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 19 जानेवारीला विंडीजविरूद्धच्या सामन्याने करणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीला मलेशियाविरुद्ध सामना होईल. तर टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 23 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळेल.

स्पर्धेचे नियम

प्रत्येक गटातील पहिले 3 संघ सुपर 6 सिक्ससाठी पात्र ठरतील. सुपर 6 फेरीतील सामन्यांचं आयोजन हे 25 ते 29 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. सुपर 6 फेरीसाठी 6-6 नुसार 2 गट असतील. सुपर 6 मधून दोन्ही गटातून अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील सामने हे 31 जानेवारीला होतील. तर 2 फेब्रुवारीला विश्व विजेता संघ निश्चित होईल.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

इंडिया विरुद्ध विंडीज, 19 जानेवारी, मलेशिया
इंडिया विरुद्ध मलेशिया, 21 जानेवारी, मलेशिया,
इंडिया विरुद्ध श्रीलंका, 23 जानेवारी, मलेशिया

वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि वैष्णवी एस.

स्टँडबाय खेळाडू : नंदना एस, इरा जे आणि अनादी टी.