फडणवसींचा भुजबळांना महत्त्वाचा सल्ला ; भेटीनंतर भुजबळ पहिल्यांदांच माध्यमांसमोर, थेट म्हणाले…

0

महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे माध्यमांसोर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं. या भेटीत फडणवीस यांच्याशी सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा झाली. महायुतीच्या विजयात ओबीसींचा जे पाठबळ मिळालं त्याचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशिर्वाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

फडणवीसांनी भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं समजतंय. 10 दिवसांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचीी चर्चा आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

काय म्हणाले छगन भुजबळ ?

मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर बोललो. काय काय घडलं, काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, वर्तमानपत्र आणि मीडियातून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या. ते म्हणाले, हे आपण मान्यच करायला हवं, की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असं भुजबळांनी नमूद केलं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

फडणवसींचा भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला

पण आता जे काही राज्यात सुरू आहे. आता पाच सहा दिवस मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या आहेत. वेगळं वातावरण आहे. एक आठ दहा दिवस मला तुम्ही द्या. त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू, असं फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असं फडणवीस म्हणाले. आठ दहा दिवस वेळ द्या, असं फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी नमूद केलं. एकंदरच फडणवीसांनी भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं समजत असून येत्या काही दिवसातंच ते भुजबळांबद्दल महत्वाचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार