सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलं, शेजाऱ्याने…

0
1

भाजप नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्येच्या घटनेबाबत तपासात अनेक खुलासे समोर येत आहेत. सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांचे विविध पथक तपास करत होते. पोलिसांनी या प्रकरणात आता मोठी कारवाई करत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सतीश वाघ यांचं अपहरण व खून या दोन्ही घटना अवघ्या तासाच्या आत घडल्याचे तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्या व्यक्तिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस आयुक्तांनी दिली घटनेची माहिती

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून “वैयक्तिक” कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सतीश वाघ यांना मारण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून खून हा खाजगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी 5 पैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली, त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेच्याबाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पाच पैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे, प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. कलम 120 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. वैयक्तिक कारणामुळं शेजारील व्यक्तीने त्यांची सुपारी दिली होती. त्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आलेली आहे. एकूण चार आरोपी ताब्यात आहेत. सतीश वाघ घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये एक आणखी व्यक्ती होता, तो फरार आहे. पोलिसांचा शोध घेत आहेत. पोलीस या घटनेचा योग्य प्रकारे तपास करत आहेत. लवकरात लवकर हा आरोपी देखील पकडला जाईल. या प्रकरणात अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही तपासून गाडीचा वापर केला होता. त्याची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली. आम्ही पुण्याला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कडक पावले उचलत आहोत. कोणी पोलीस दलाला वैयक्तिक कारणासाठी काही चुकीचं बोलत असेल, टीका करत असेल तर ते चुकीचे आहे शहरात अत्यंत योग्य पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस पूर्णपणे सुसज्ज आहेत, असेही अमितेश कुमार यांनी पुढे म्हटलं आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य