मुख्यमंत्री फडणवीसांना ‘हे’ 7 नेते नकोच?, या दिग्गजांचीही नावे खराब कामगिरी आणि वादग्रस्त कारकिर्दीमुळे अडकली

0
1

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काल (9 डिसेंबर) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे. 16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी विधानसभा अधिवेशनापूर्वी म्हणजेच 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यताही आहे. मात्र, मागील मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेली अनेक दिग्गजांची नावे खराब कामगिरी आणि वादग्रस्त कारकिर्दीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 7 जणांच्या नावावर फुली मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढल्याने आणि मागील पाच वर्षांमध्ये कोणताही अजेंडा न घेता फक्त पाच वर्षे पूर्ण करण्याच्या हेतूने कोणतीही नियमावली राबविण्यात आलेली त्यामुळे असंख्य निर्णय आणि वर्तणूक याकडे झालेले दुर्लक्ष टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच स्थान दिले जाणार आहे. माजी वादग्रस्त मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये यावर एनडीएचे केंद्रीय नेतृत्व ठाम आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

महायुती 2.0 एक अनोख पर्व निर्माण करण्याचे हेतूने भारतीय जनता पक्ष कोणत्याही पातळीवर तडजोड करण्यास तयार नसल्यामुळे ‘या’ नेत्यांना मंत्रिमंडळात नो एंट्री? झाली असल्याची चर्चा सध्या विधीमंडळ परिसरामध्ये रंगत आहे.

शिवसेना (शिंदे गट)

संजय राठोड – अन्न आणि औषध प्रशासन, जलसंधारण विभाग

अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक व पणन विभाग

तानाजी सावंत – आरोग्य विभाग

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

दिलीप वळसे पाटील – सहकार विभाग

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण विभाग

भाजप

सुरेश खाडे – कामगार विभाग

विजयकुमार गावित – आदिवासी कल्याण विभाग

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

महायुतीतील या 7 नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

महायुतीतील संभाव्य मंत्र्यांची यादी

शिवसेना (शिंदे गट) १० नावे

उदय सामंत

शंभूराज देसाई

दादा भुसे

गुलाबराव पाटील

संजय शिरसाट

भरत गोगावले

प्रताप सरनाईक

आशिष जैस्वाल

राजेश क्षीरसागर

अर्जुन खोतकर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ९ नावे

छगन भुजबळ

धनंजय मुंडे

धर्मरावबाबा आत्राम

आदिती तटकरे

संजय बनसोड

नरहरी झिरवाळ

दत्ता भरणे

अनिल भाईदास पाटील

मकरंद आबा पाटील

भारतीय जनता पक्ष – १० नावे

चंद्रकांत पाटील

गिरीश महाजन

सुधीर मुनगंटीवार

चंद्रशेखर बावनकुळे

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

रवींद्र चव्हाण

मंगल प्रभात लोढा

राधाकृष्ण विखे पाटील

शिवेंद्रराजे भोसले

अतुल सावे

पंकजा मुंडे

 

माधुरी मिसाळ

देवयानी फरांदे

संजय कुटे

आशिष शेलार

गणेश नाईक