मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Action मध्ये, निकालाआधीच विश्वासू नेत्यावर सोपवली ही जबाबदारी

0
1

बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता 24 तासापेक्षा कमी कालावधी उरला आहे. बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मागच्या 30 वर्षातील सर्वाधिक मतदान झालं आहे. जवळपास 66 टक्के मतदान झालं आहे. हे वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? या बद्दल विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सामान्यत: वाढलेल्या मतदानाचा अर्थ असा काढला जातो की, विद्यमान प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा हा परिणाम आहे. पण महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली. त्याशिवाय अन्य कल्याणकारी योजना सुरु केल्या. लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. अन्य योजना मोफत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकतं. कारण महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. मतदानाची वाढती टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार? हे आता उद्या 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोल्सचे निष्कर्ष समोर आले. अगदी कालही काही एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले. बहुतांश एक्झिट पोल्सनी पुन्हा महायुती सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवला आहे. निकालाच चित्र काय आहे? ते उद्या स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील सध्याच चित्र असं आहे की, यावेळी सात प्रमुख पक्षांमध्ये निवडणूक झाली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मदत लागेल असा अंदाज आहे. तीच शक्यता लक्षात घेऊन महायुतीने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

एकनाथ शिंदेंनी काय पाऊल उचललं?

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावर अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सोपवली आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत महायुती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत दिसणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आपल्या विश्वासू नेत्यांवर सोपवल्याची माहीती आहे.

भाजप नेते सक्रीय

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते सक्रीय झाल्याची माहीती आहे. देवेंद्र फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमवीची जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला