छत्रपती शिवस्पर्शाने पावन शिवगंगा खोऱ्यात आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या विजयी चौकाराच्या एल्गारात प्रचाराचा भव्य शुभारंभ

सामूहिक प्रयत्नाने विजयी चौकार गाठण्याचा संकल्प मितभाषी नेतृत्वाचे प्रचार शुभारंभातही वेगळेपण

0

खडकवासला मतदारसंघात भाजपा-महायुतीचे उमेदवार आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या प्रचार व पदयात्रेची उत्साहपूर्ण सुरुवात आज शिवगंगा खोऱ्यातील श्री तुकाई देवी मंदिर, कोंढणपूर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आली. या प्रसंगी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे या कार्यक्रमाचा भव्य उत्सव अधिकच गगनाला भिडला.

महायुतीतील माजी नगरसेवक दिलीप बराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खडकवासला शिवसेना अध्यक्ष सतीश घाटे, माजी नगरसेवक प्रदीप (बाबा) धुमाळ, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, बाळासाहेब नवले, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला अध्यक्ष राजेंद्र पवार, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरूण राजवाडे, खडकवासला भाजपा अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, राजश्री नवले, राणी भोसले, अश्विनी भागवत, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री भुमकर, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, भाजपा खडकवासला ग्रामीण अध्यक्ष नवनाथ तागुंदे यांसह महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

ग्रामीण भागातून प्रचाराचा शुभारंभ – चौथ्यांदा विजयी होण्याचे आवाहन

आमदार भिमराव अण्णा तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघातील ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करून ग्रामीण मतदारांचा चौथ्यांदा विश्वास संपादन करण्याचे उद्दिष्ट ठेऊन नागरिकांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मागील निवडणुकीत ग्रामीण भागातून मिळालेल्या लीडमुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावला असून, गेल्या १३ वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांनी यावेळीही महायुतीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.

विकासाच्या वचनाचा पुनरुच्चार

आमदार तापकीर यांनी सांगितले की, “भाजपा-शिवसेना आणि महायुतीच्या सरकारने राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत.” कोंढणपूर, कल्याण, सिंहगड, रहाटवडे, आर्वी, शिवापुर, खेड शिवापुर, श्रीराम नगर, गाउडदरा, गोगलवाडी यांसारख्या गावांना भेट देऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि आगामी निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेला नागरिकांचा अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा पाहता, खडकवासला मतदारसंघात महायुतीसाठी निर्माण झालेला सकारात्मक वातावरण स्पष्टपणे जाणवत आहे.