बारामतीच्या कन्हेरीतून पवार कुटुंबीय प्रचाराचा शुभारंभ करत असतात. या परंपरेप्रमाणे युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार यांची पहिली सभा कन्हेरीत होत आहे. या सभेला बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. या भाषणात शरद पवार यांनी विविध मुद्दे मांडले. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं गेलं. यावर भाष्य केलं.






शरद पवार काय म्हणाले?
चार वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद बारामतीला आलं. तेही आपल्या पक्षाला मिळालं. मी अनेकवेळाला विरोधी पक्षाचा नेता होतो. अनेक वेळेला सत्ता माझ्या हातात नव्हती. जेव्हा सत्ता नव्हती तेव्हाही लोकांनी मला पाठबळ दिलं. त्यांनी माझी साथ कधी सोडली नाही. आज बारामतीच्या विकासाबद्दल बोललं जातं. त्यात माझा हातभार असेल, अजितदादांचा हातभार असेल. सगळ्यांच्या मदतीने हा विकास झालेला आहे. ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायचं हा माझा स्वभाव आहे, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांचा मोदींवर निशाणा
नवा उद्योग हा महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये सुरु करा, असं मोदींनी टाटांना सांगितलं. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नरेंद्र मोदींनी गुजरातला नेला. त्यांना आतापर्यंत जसं यश मिळालं, तसं आता मिळणार नाही. यंदाची निवडणूक वेगळी आहे, असं शरद पवार म्हणाले.
इंदापूरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनीही या सभेला संबोधित केलं आहे. अनेक वर्षानंतर योग जुळन आला आहे. बारामतीचा इंदापूरसहीत, आमदार आपल्याला सरकार बनवताना पाहिजे. प्रयत्नाची पराकाष्टा करा, मनमोहन सिंहसाहेब देशाचे पंतप्रधान होते. प्रशासनच काम समजून करणारे आहोत. महाराष्ट्रातले जे शेतकरी कर्जमुक्तीत बसले नाही त्यांना केंद्राकडून मदत केली. नवीन पिढीला पुढं संस्कार चांगले देण्याच आमच काम आहे. चांगल मार्गदर्शन करून समाजाची सेवा करून पुढे जायचं आहे. सामान्य माणसाचे बाळकडू आहे, सुप्रियाताई चांगल काम करत आहेत. वक्फ बोर्डाचं बिल आलं होतं. तेव्हा भाषण कुणी केलं तर सुप्रियाताईंनी केलं. सरकारने ते बिल जेपीसीकडे पाठवलं, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.











