नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन केले; रवीन ग्रुपला (Ravin Group) मेट्रो 3 च्या विद्युतीकरणामध्ये भागीदार 

0

रवीन ग्रुप मेट्रो लाईन 3 (Metro Line 3) तसेच बांधकाम सुरू असलेल्या इतर मेट्रोजसाठी अत्यंत विशिष्ट अग्निशामक बचाव आणि इतर विद्युत केबल्सच्या पुरवठा आणि स्थापनेच्या देखरेखीकरता  विश्वासपूर्ण भागीदार म्हणून काम करत आहे.

  • रवीन ग्रुपने मुंबई, पुणे आणि जम्मू-काश्मीरमधील मेट्रो प्रकल्पांसाठी एकूण 300 कोटी रुपयांचा आहे.
  • या प्रोजेक्ट्समध्ये “इग्नामो” केबल्सचा वापर करण्यात आला होता. “इग्नामो” केबल्स विशेषकरून अग्निप्रतिकारक म्हणजेच फायर सेफ आणि फायर सर्व्हायव्हल अशा केबल्स आहेत. ही सर्व काळजी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घेतली गेली.
  • रवीन ग्रुपने या प्रोजेक्ट्सना 3000 किलोमीटरपेक्षा जास्त केबल्स पुरविल्या आहेत.
अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पुणे : मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) किंवा एक्वा लाईन (Aqua Line) प्रोजेक्टच्या सुरक्षिततेसाठी सहयोगी आणि भागीदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर रोजी या ऐतिहासिक भूमिगत मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.

बऱ्याच काळापर्यंत, विशिष्ट अग्निशामक बचाव उत्पादने भारतात तयार केली जात नव्हती. परंतु रवीनने या आव्हानांवर मात केली. त्यांनी संपूर्ण उत्पादन प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू केली. त्यांनी सिप्झ ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पर्यंत भूमिगत पट्ट्यातील फेज 1 आणि नंतर फेज 2 मधील कुलाबापर्यंत काम केले. त्यात त्यांनी विशेष अग्निशामक बचाव आणि इतर केबल्सचा केवळ पुरवठा केला, त्यांच्या स्थापनेची (इंस्टॉलेशन) देखरेखदेखील केली.

भूमिगत मेट्रोज, बंदिस्त ठिकाणे, उंच इमारती इत्यादींमध्ये आगीच्या धोक्यांपासून जीवन आणि मालमत्ता सुरक्षित करण्याला महत्त्व आहे. रवीनकडून इग्नामो फायर सर्व्हायव्हल केबल्सची रचना अशी केली गेली आहे की त्या अगदी तीव्र आग सहन करू शकतात आणि 120 मिनिटांहून अधिक काळ त्यांची सर्किट अखंडता राखतात. तसेच, हे केबल्स जळण्याच्या वेळी धूर किंवा विषारी वायू सोडत नाहीत. या केबल्सची डिझाईन, उत्पादन आणि चाचणी अत्यंत कडक मापदंडांत केली जाते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मुंबईच्या शहरी परिवर्तनात जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडने रवीन ग्रुपच्या सहकार्याने मेट्रो लाइन 3 साठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मेट्रो 3 एक्वा लाईन कार्यान्वित झाली की ती प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

रवीन ग्रुपने मुंबईत विविध अतिरिक्त हाय व्होल्टेज प्रकल्प राबविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांची ईएचव्ही ईपीसी (EHV EPC) प्रकल्पांमध्ये निपुणता आहे. त्याद्वारा त्यांनी 1800 मेगावॅटपेक्षा जास्त वीजपुरवठा केला आहे.

रवीन ग्रुप केबल उत्पादनात 73 वर्षांहून अधिक काळ असून ते जागतिक दर्जाचे केबल उपाय प्रदान करण्यात अग्रणी आहेत. केबलशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा, तंत्रज्ञान आणि उपाययोजना पुरवतात. कंपनीने जागतिक स्तरावर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये भागीदारी केली आहे. त्यामध्ये जम्मू, बारामुल्ला रेल कॉरिडॉरचा समावेश आहे. या कॉरिडॉरचा चिनाब नदीवरचा रेल्वे पूल अभियांत्रिकीचा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यांनी भारतातील विविध मेट्रोज जसे पुणे मेट्रो, हैदराबाद मेट्रो, चेन्नई मेट्रो, नागपूर मेट्रो इत्यादीमध्ये भागीदारी केली आहे. दिल्ली, मुंबई आणि आता नवीन पनवेल विमानतळ, बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरसह संपूर्ण जिओ कॉम्प्लेक्स, अबू धाबीमधील खलिफा बंदर, दोहा मेट्रो रेल, भारतातील आणि आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीमधील जवळजवळ सर्व प्रमुख सौर प्रकल्प, डेटा सेंटर आणि सर्व प्रमुख उद्योग आणि जीवनावश्यक सेवांमध्ये देखील भागीदारी केली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता