मुख्यमंत्री लाडकी बहीण …तरच तुम्हाला 5500 मिळणार रुपयांचा दिवाळी बोनस! तुम्हीही एकदा अटी तर वाचा!

0

राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते चौथ्या हफ्त्यापर्यंतची रक्कमही महिलांच्या खात्यात डिपॉझीट झाल्याचं सरकारी अधिकारी सांगतात. अशातच दिवाळाआधी महिलांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. तर काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. म्हणजे एकूण 5500 रुपयांचा दिवाळी बोनस या महिलांना दिला जाणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सरकारने महिलांसाठी ही महत्वाकांशी योजना सुरु केली असून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. सरकारकडून ही रक्कम थेट महिलांच्या खात्यावर जमा केली जाते. पण यासाठी महिलांना काही नियमांचं पालन करावं लागतं. म्हणजेच महिलेचं वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

येत्या काही दिवसात दिवाळीचा सण-उत्सव सुरु होणार आहे. त्यासाठी महिलांनी शॉपिंग करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अशातच महिलांना सरकारकडून 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण ही रक्कम अशा महिलांनाच मिळणार आहे, ज्या महिला या योजनेच्या अटी पूर्ण करणार आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

‘या’ आहेत लाडकी बहीण योजनेच्या अटी
महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.

योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.

आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.

ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे. या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.