पुणे जिल्हा ‘भाजप’चा एकमेव मतदारसंघ धोक्यात? भाजपची 3 शकलं भाजपा बंडखोरीमुळेच यंदा ‘पवारां’वरच गुलाल?

0
1

पुणे जिल्ह्यात ‘भाजप’चा 10 वर्ष ताब्यात असलेला मतदारसंघ दौंड विधानसभा मतदारसंघ. 20 वर्षात हा मतदारसंघ नेहमीच कुल गट आणि थोरात गट या गटातच तालुक्याची राजकीय ताकद विभागली गेली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांना हादरा देणारा निकाल लागला. विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे एकत्र महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या बाजूने असतानाही खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे लीड घेतले. यातूनच ‘तिसरी’शक्ती उदयास आल्याची चिन्हे दिसत आहे. ही तिसरी शक्ती? विधानसभेला हीच तिसरी शक्ती या दोन्ही गटांना कशी आव्हानात्मक ठरेल? उमेदवार कोण असेल? याचा सविस्तर आढावा…..

दौंड विधानसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला शरद पवार यांच्याशी निष्ठावान आणि सुप्रिया सुळेंच्या प्रचारात प्रचंड मेहनत घेतलेल्या तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्याबरोबरच सरचिटणीस नामदेव ताकवणे हेही तयारीला लागले आहेत. भाजपकडून यंदाही राहुल कुल हेच उमेदवार असतील हे स्पष्ट झाल्याने सलग 10 वर्षातील विकासकामांच्या जोरावर राहुल कुल यांनाही आमदारकी कायम राखण्याची ‘आशा’ आहे. दौंड विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा ‘सुरक्षित’ सध्या मानला जात असला तरी सुद्धा या मतदारसंघांमध्ये पारंपारिक भारतीय जनता पक्षाचे काम करणारे कार्यकर्तेच नाराज झाल्याने लोकसभेच्या अगोदर नामदेव (बापू) ताकवणे यांनी पक्षाला रामराम केला तर महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे ही दौंड विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहेत. मुळात सलग मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीतून रासप आणि लगेच रासपमधून भाजपवासी झालेल्या राहुल कुल यांना यंदा मात्र मूळ भाजप कार्यकर्ते असलेले आणि आमदारकीसाठी इच्छुक असलेले हे दोन चेहरेच मोठी अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दौंड मतदार संघामध्ये यंदा प्रथमच चेहरा नसताना विरोधी बाजूला मताधिक्य मिळत असल्याने कोण बाजी मारेल? कोण विधानसभा गाठेल ही खमंग चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

दौंड तालुक्याची पार्श्वभूमी आणि कुल घराण्याचं साम्राज्य-

दौंड विधानसभा मतदारसंघ 1990 मध्ये उशादेवी जगदाळे यांचा पराभव करत अपक्ष सुभाष कुल आमदार झाले.

1995 मध्ये राज्यात काँग्रेसविरोधी लाट असतानाही सुभाष कुल तब्बल 92 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला.

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना सुभाष कुलही पवारांसोबत अन् सलग तिसऱ्यांदा आमदार काँग्रेसचे उमेदवार कटारिया यांना केवळ 18 हजार मते यावरुनच दौंड मतदारसंघावर कुल यांचे एकहाती वर्चस्व सिद्ध होते. (2001 मध्ये सुभाष कुल यांचे निधन पोटनिवडणूक रंजना कुल विजयी)

2004च्या विधानसभा निवडणुकीत कुल यांच्या वर्चस्वाला थोरात यांचे आव्हान तरी निवडणुकीत रंजना कुल 24हजार मतांनी विजयी.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिरंजीव राहुल कुल उमेदवार अन् यावेळी रमेश थोरातांची विजयी बंडखोरी (कुल घराण्याचा पहिल्यांदाच पराभव)

 2014 लोकसभा निवडणूक दौंडमधून रासपच्या महादेव जानकर यांना 25 हजारांचे लीड. निर्णायक धनगर मते आणि भाजपचा पाठिंब्यावर बंडखोरीने राष्ट्रवादीच्या थोरात यांचा 11 हजार मतांनी पराभव (पुन्हा घरात आमदारकी)

2019 मध्ये कुल यांनी भाजपचा एबी फॉर्म जोडला. पुन्हा रमेश थोरात विरुद्ध राहुल कुल अशी लढतही रंगली. पण रासप सोडल्याचा परिणाम, कारखान्यात भ्रष्टाचाराचे आरोप निकालावर परिणाम कुल पडतात की काय असे चित्र तयार पण अखेरीस कुल यांचा केवळ 673 मतांनी विजय झाल्यापासून कुल यांनी बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात 1985पासून जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय असून या 40 वर्षांपैकी तब्बल 13 वर्षे ते बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. अजित पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

या आहेत दौंड तालुक्यातील राजकिय समीकरणे –

2014 आणि 2019 या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना दौंडमध्ये आघाडी मिळाली नव्हती यावेळीही आघाडी मिळणारच नाही, असा सर्वांचा अंदाज असताना दौंडमध्ये 25 हजारांचे मताधिक्याने शरद पवार यांना दौंडची आमदारकी टप्प्यात असल्याचा कॉन्फिडन्स आला आहे. यात शरद पवार यांचा उमेदवार कोण असणार एवढाच प्रश्न बाकी आहे. …यंदा आमदारकी जिंकायचीच! निश्चय करत थोरात समर्थकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पण निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे दोनच पर्याय आहेत. समर्थक त्यांना शरद पवारांशी जुळवून घेण्याचा आग्रह करत आहेत. पण अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे जातील असे चित्र दिसत नाही. शिवाय थोरातसोबत नसतानाही लोकसभेला 25 हजारांचे मताधिक्य मिळाल्यामुळे शरद पवार थोरातांबाबत कितपत सकारात्मक हेही पाहावे लागणार आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

सध्याच्या घडीला शरद पवार यांच्याशी निष्ठावान राहिलेल्या आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जीवतोड मेहनत घेतलेल्या तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस नामदेव ताकवणे हेही इच्छुक आहेत. भाजपकडून यंदाही राहुल कुल हेच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. सलग 10 वर्षे सत्ता हातात असल्याने केलेल्या विकासकामांच्या जोरावर राहुल कुल यांनाही उमेदवारी आणि आमदारकी कायम राखू असा आशावाद आहे. पण महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे देखील इच्छुक आहेत. यात आता कोण बाजी मारणार आणि कोण विधानसभा गाठणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.