पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट, रुग्णालयाने दिलं ‘हे’ कारण

0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्यायत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दिल्यानंतर त्या 20 जुलै रोजी जबाब देण्यासाठी पुण्यात येणार होत्या. मात्र त्याआधीच यूपीएससीनं पूजा खेडकरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे वाशिमहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या पूजा खेडकर मध्येच गायब झाल्या. पूजा खेडकर यांना कालपर्यंत मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये हजर होण्यास देखील सांगण्यात आलं होतं. मात्र त्या अजून पर्यंत मसुरीत पोहोचल्या नाहीत. पूजा खेडकर यांचा फोनही लागत नसल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.

आई-वडिलांचा घटस्फोट बनाव
दुसरीकडे, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट हा बनाव असल्याचं समोर आलंय. पुजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यासाठी त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र, लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकरांनी मनोरमा यांचा पत्नी असा उल्लेख केल्याचं समोर आलंय. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा खरंच घटस्फोट झाला होता का? याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिलेयत. खेडकर यांचा 2010 साली घटस्फोट झाल्याचे पुरावे समोर आलेत. मात्र हा घटस्फोट फक्त नावापुरती असल्याचे पुरावे देखील उपलब्ध झालेयत. त्यामुळे पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट
दरम्यान, पूजा खेडकर यांना पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून देण्यात आलेल्या दीव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी कुणीही दोषी नसल्याचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ही चौकशी करण्यात आली होती त्यात कोणीही दोषी नसल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं. अर्ज दाखल करताना सादर केलेली कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या विभागाची नसल्याचे ही रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी म्हटलंय.

मनोरमा खेडकर यांची तक्रार
पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांनी कोर्टात पुणे पोलिसांच्या तक्रारीचा पाढा वाचला. पोलीस कोठडीत देण्यात येणारे जेवण बेचव असल्याची तक्रार खेडकरांनी कोर्टात केलीय. शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकवल्याप्रकरणी त्या पोलीस कोठडीत आहेत. पुणे पोलीस कोठडीत बेचव जेवण देत असल्याचा आरोप मनोरमा खेडकरांनी केलाय. मात्र पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन