कोथरूड मधील चांदणी चौक येथील भगवान महावीर मंडळ, पुणे व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदीर, चांदणी चौक यांच्या वतीने रविवार दि.२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच दंत चिकित्सा व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दिगंबर जैन समाजाचे, राष्ट्रसंत, कठोर साधक परमपूज्य राष्ट्र संत आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण तसेच शिबिराचे उदघाटन मा. नगरसेवक पृथ्वीराजदादा सुतार हस्ते करण्यात आले. शिबिराची सुरवात दीप प्रज्वलन करून नमोकार महामंत्र ने झाली.






या वेळी मा. नगरसेवक पृथ्वीराजदादा सुतार यांनी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, तसेच समाजासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवीत असल्याबद्दल व परम पूज्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य मला दिल्याबद्दल भगवान महावीर मंडळ व दिगंबर जैन मंदिराच्या विश्वस्त व सभासदांचे आभार मानले. यापुढेही समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वजण एकत्रित काम करू असे त्यांनी आश्वस्त केले.
यावेळी सर्वांचे स्वागत विश्वस्त मोहन कुडचे यांनी, शिबिराचे प्रास्ताविक मुख्य संयोजक प्रीतम मेहता यांनी तर सूत्र संचालन शोभा पोकळे यांनी केले.
गुरुपौर्णिमेच्यानिमित्त मंदिरात अभिषेक, महाशांतीधारा, पूजा पाठ आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दंत चिकित्सा व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरमध्ये डॉ.राधिका शहा-दोशी, डॉ.प्रियांका कौशल, डॉ. मधुरा चिटणीस-लातूरकर या ३ महिला दंत वैद्य यांनी २३० लोकांची मोफत तपासणी केली. डोळे तपासणी साठी देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे श्री.गणेश पाटील व सहकारी यांनी १०८ लोकांची मोफत तपासणी करण्यात आली.
यावेळी मंदिराचे अध्यक्ष – दिनेश गणेशवाडे, उपाध्यक्ष- मोहन कुडचे, खजिनदार – श्रीकांत पाटील, शिबिराचे मुख्य संयोजक विश्वस्त प्रितम मेहता तसेच शिरीष बोरगावे, सुनील बिरनाळे, महावीर पालगौडर, अशोक मकदूम, शोभा पोकळे व प्रणय मेहता इतर पदाधिकारी व जैन समाजातील नागरिक बंधु – भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.











