महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे. याचसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. राज्यसरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकानं जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष 18 हजार रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय?
महाराष्ट्र रहिवासी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
घरात कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)
कोणती कागदपत्रं लागणार?
आधारकार्ड
रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.