आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी तयारी करायला सुरूवात केली आहे. मतदार संघाच्या चाचपण्या सुरु आहेत, बैठकांचा धडाकाही लावला जातोय. या सर्वात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नेमक्या किती जागा जिंकणार? याचा थेट पवारांनी आकडाच सांगितला आहे. त्यामुळे पवारांनी नेमक्या किती जागांचा अंदाज वर्तवला आहे. हे जाणून घेऊयात…..
शरद पवार एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शरद पवारांनी विधानसभेत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार याचा आकडा सांगितला आहे. विधानसभेच्या 288 जागा आहे. या 288 जागांपैकी सव्वा दोनशे (225) पेक्षाहून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले की, विधानसभेच्या 288 जागेवर मला चित्र असं दिसतंय की सव्वा दोनशे (225) पेक्षा जास्त जागा या विरोधकांच्या येतील. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात आपलं राज्य आणुया, आणि सत्तेच्या मार्फत लोकांच्या जीवनात बदल कसा होईल? याची काळजी आपण घेऊयात, असे शरद पवार यांनी सांगितले.