विश्व हिंदू मराठा संघ, महाराष्ट्र राज्य व धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक डेक्कन येथे श्री शंभुराजेंच्या मूर्तीवर मेघडंबरी व आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध मान्यवर तसेच असंख्य शिवशंभु प्रेमी उपस्थित होते. श्री शंभुराजेंची महाआरती पार पडली.
गोमातेचे पूजन करून व वेदो मंत्र उच्चारातून भूमीचे पूजन झाले. यावेळी या स्मारकाचे संस्थापक पुण्याचे माजी महापौर सुरेश नानासाहेब नाशिककर, शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे,राज्यसभेच्या खासदार सौ.मेधाताई कुलकर्णी, पुणे – नाशिक महामार्गाचे इंजिनीअर व पुणे जिल्हा भाजपा चे उपाध्यक्ष मा.दिलीप मेदगे साहेब, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील रासने, भारतीय किसान संघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड.अशोक फडके, जाणता राजा या महानाट्य चे दिग्दर्शक योगेश शिरोळे, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट १३ वे वंशज कुणाल मालुसरे, महाराणी येसुराणी साहेबांचे वंशज व पिळाजीराजे शिर्के यांचे वंशज दिपक शिर्के, श्रीशंभूराजेंच्या दुध आई धाराऊ आईंचे वंशज अमित गाडे, मुळशी केसरी गणेश कंधारे उपस्थित होते. या सोहोळ्याचे आयोजन विश्व हिंदू मराठा संघाचे संस्थापक – अध्यक्ष व धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष भूषण वरपे, उपाध्यक्ष वैभव दिघे, सचिव गौरव धावडे, कार्याध्यक्ष करण वाकोडे, सभासद योगेश कडू, श्रीकांत महाडीक, विपुल गटलेवार, प्रतीक यादव, शैलेश बोंबले यांनी केले होते.