राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार मातोश्रीच्या छत्रछायेत दाखल; शरद पवारांच्या पुण्यातील या 2 शिलेदारांचे ‘टेन्शन’ वाढलं 

0

वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाबाबत देखील निर्णय होऊ शकतो. वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश झाल्यास मोरे हे हडपसर किंवा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. तर दुसरीकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती असणारे सचिन दोडके हे इच्छुक आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

त्यामुळे या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा आग्रही आहे. अशातच जर वसंत मोरे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश झाल्यास यातील किमान एक तरी जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला सोडावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या घडत असलेला राजकीय घडामोडींमुळे शरद पवारांच्या शिलेदारांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे.वसंत मोरे हे 2019 ची निवडणूक हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढले होते त्यांनी ही निवडणूक मनसे कडून लढवली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चेतन तुपे यांनी अवघ्या अडीच हजारच्या फरकाने भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता. वसंत मोरे हे 34 हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. चेतन तुपे यांचा विजय सुकर करण्यात आणि टिळकरांना पराभूत करण्यात वसंत मोरे फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

यावेळी महायुतीकडून आमदार चेतन तुपे हे हडपसर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार आहेत. मागील वेळेस भाजपकडून निवडणूक लढलेल्या योगेश टिळेकरांचं पुनर्वसन भाजपकडून करण्यात आला आहे. विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या जागेसाठी शिंदे गटाकडून शहर प्रमुख नाना भानगिरे आणि अजित पवार गटातून चेतन तुपे यांच्यामध्ये चुरस आहे. तर महाविकास आघाडीचा विचार केल्यास हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.आता जर ठाकरे गटांमध्ये वसंत मोरे यांचा प्रवेश झाल्यास विधानसभा मतदारसंघातील सर्व समीकरण बदलू शकतात.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

वसंत मोरे फॅक्टर हा विधानसभा निवडणुकीत जेवढा महायुतीच्या उमेदवारांसाठी करणार आहे तितकाच त्रासदायक महाविकास आघाडीसाठी देखील राहणार आहे. त्यामुळे वसंत मोरे यांचा प्रवेश होणार का? झाल्यास तो महायुतीच्या जागा वाटपासाठी त्रास त्रासदायक ठरणार का? आणि मागच्या वेळी वसंत मोरे फॅक्टरचा फायदा झालेले व चेतन तुपे यांना याचा किती फटका बसणार हे पाहावे लागले.