नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्याकडून शाळेच्या पहिल्या दिवशीच अनोखी भेट देऊन स्वागत

0

स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल, एलएमडी चौक,बावधन खुर्द या शाळेत नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्याप्रमुख उपस्थितीसह बावधन सिटिझन फोरम चे मनिष देव, सचिन वानखेडे, धनंजय झेंडे, तसेच डॉ.मनीषा जाधव, पर्यवेक्षिका सौ.वनवे मॅडम, मुख्याध्यापिका सौ.नवले मॅडम आणि १५३ बी, ८२ बी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिक आणि पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा पार पडला.

स्वागत सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात. बालवाडी आणि पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांना फुगे आणि खाऊ देण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी परिसरातील विद्यार्थ्यांच्या चांगल्या शैक्षणिक सुविधेसाठी स्वामी विवेकांनद ई लर्निंग शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच शाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधा येत्या काळात विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे सांगितले. शिक्षणाचे महत्त्व देखील त्यांनी यावेळी पटवून दिले. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी परिसरातच पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणाची सुविधा देखील करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक लोक प्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक चांगल्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येतील या बद्दल दिलीप अण्णांनी पालकांना आणि नागरिकांना आश्वासन दिले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा