‘तारीख ठरली! अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? राणेंना बक्षीस अन् गोगावल्यांना पुन्हा फटकाच? नवी चर्चा सूरू

0

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या आधी मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागलेल्या चा डॅमेज कंट्रोल करण्याच्या नावाने आणि जी बलस्थाने कायम राहिले आहेत त्या भागातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून कायम मंत्रिपदाच्या आणि पालकमंत्री म्हणून वर्णी लागण्यासाठी आग्रही असणाऱ्या भरतशेठ गोगावले यांच्या पदरी मात्र यावेळी ही निराशाच पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा गड मानला जाणाऱ्या कोकण पट्ट्यामध्ये अजित पवार आणि नारायण राणे यांनी मोठा शह दिला परंतु केंद्रीय स्तरावर मंत्रीपद न घेतलेल्या या दोन नेत्यांचा पुनर्वसन या मंत्रिमंडळ विस्तारात होण्याची शक्यता आहे. अगोदरच शिंदे गटाच्या वतीने कोकण पट्ट्यामध्ये दीपक केसरकर उदय सामंत यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. तर आदित्य तटकरे यांच्यामार्फत राष्ट्रवादी ही मंत्रिमंडळात आहे. पक्षामध्ये नारायण राणे यांना ताकद देणे ही भारतीय जनता पक्षासाठी अत्यावश्यक गोष्ट असून त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागामध्ये नितेश राणे यांची वर्णी पक्की मानली जात आहे. कदाचित त्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून जबाबदारी ही दिली जाऊ शकते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल(सोमवारी) मध्यरात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण बघायला मिळत आहे. त्यामुळेच पावसाळी अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जावा, अशी मागणी आमदारांकडून होत असल्याचा अंदाज आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी २७ जून रोजी केला जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयशाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तर काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नुसत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने अजित पवार गटापेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या शिंदे गटातील नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा अंदाज आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. या मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कोणत्या आमदारांची मंत्रीपदी लागणार वर्णी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

शिवसेना : आशिष जैस्वाल, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, आणि लता सोनावणे

राष्ट्रवादी: इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप

भाजप: नितेश राणे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राणाजगजित सिंह पाटील, देवयानी फरांदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.