कोथरूड : कोथरूड मधील वाढते अपघात आणि चांदणी चौकशी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुमारे 1000 कोटी रुपये खर्च करून चांदणी चौकातील उड्डाणपुले बांधण्यात आले परंतु या घाईच्या कामांमध्ये करण्यात आलेल्या चुकां मुळे चांदणी चौकातील अपघाताचे सत्र सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आपली हट्टवादी भूमिका सोडत नाही आणि पुणे महानगरपालिका रस्त्याची जबाबदारी घेण्यास तयार नाही त्यामुळे आज पुन्हा एकदा पाच ते सहा निष्पाप जीवांना त्याचा फटका बसला आहे. चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या उतारावरती आज पुन्हा भीषण अपघात घडला आहे. एसटी महामंडळाची महाकार्गो मालवाहतूक करणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
४ मे रोजीही याच ठिकाणी पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला होता. पीएमपीएल बसणे अनेक वाहनांना उडवले होते. या अपघातात बस खाली सापडलेल्या एका व्यक्तीला नागरिकांनी बाहेर काढले होते. तसाच अपघात आज पुन्हा लोहिया जैन आयटी पार्क समोर घडला आहे. एसटीची महाकार्गो मालवाहतूक करणारी गाडी उतारावरून खाली येत असताना हा अपघात घडला आहे.
या भागामध्ये रस्त्याला तीव्र उतार असल्यामुळे वारंवार अति जड वाहनांचे ब्रेक फेल होत असून त्यामुळे आजूबाजूची वाहने चिरडली जात आहेत. आजही महाकार्गो गाडीचा ब्रेक फेल झाल्या नंतर या मध्ये कोणाचा बळी जाऊ नये म्हणून रस्त्याच्या दुभाजकावरती बस दाबत असताना समोरून आलेल्या अतिजड ‘आर एम सी’गाडीही समोरच्या इमारतीला जाऊन धडकली. त्याबरोबरच महाकार्गो बस विरुद्ध दिशेने वाहने चिरडत चालली होती यामध्ये तीन तेचार दुचाकी बाधित झाल्या आहेत. दोन जणांची परिस्थिती गंभीर असून जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
तीव्र उतार कमी करणे अति आवश्यक: दिलीप वेडेपाटील
चांदणी चौकामध्ये 4 मे रोजी झालेल्या पीएमपीएलच्या अपघातापासून या भागातील वाहतूक कोंडी आणि तीव्र उतार कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची वारंवार गाठीभेटी घेत आहे परंतु त्यांच्याकडून असहकार्याची भूमिका कायमच आहे. मुळात पुणे महानगरपालिकेकडून चांदणी चौक प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हस्तांतरण करून घेतल्यानंतर या भागातील सेवा रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती परंतु आज काम पूर्ण झाल्यानंतर याच प्राधिकरणाकडून सेवा रस्त्याच्या कामाबाबत हात झटकण्याचे काम केले जात आहे.
पूर्वी चांदणी चौक मध्ये एक उड्डाणपूल असताना वाहतूक कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात होत होती त्यावर उपाय म्हणून हजारो कोटी रुपये खर्च करून पुणे महानगरपालिका व केंद्र शासनाच्या वतीने दोन उड्डाणपूल दोन भुयारी मार्ग असे भव्य दिव्य काम केले आहे परंतु हे काम करताना मूळ मुंबई कडून कोथरूड कडे येणारा तीव्र उतार कमी करणे शक्य असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने त्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने सेवा रस्ता बनवण्यात आला आहे. त्यामुळे एक आठवड्यामध्ये तीन अपघात या ठिकाणी घडले आहेत यावरती त्वरित उपाय करण्याची गरज असल्याची माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी दिलीप वेडे पाटील यांनी दिली.