मोठ्या मोठ्यांना जागा दाखवली “३महिन्यांत मी हे राज्यही तुमच्या हातात देतो”, पवारांकडून सूचक संकेत

0
1

सत्तेचा उपयोग तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी केला जाईल, अशी स्थिती निर्माण करायची आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे देखील शरद पवारांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या तयारी दरम्यानच शरद पवारांनी राज्यात दुष्काळी भागांच्या पाहणी दौराही सुरु केला आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी मोठं विधान केले आहे. माझी खात्री आहे लोकसभा निवडणुकीत जे तुम्ही करून दाखवलं, ते आणखीण तीन महिन्यांनी (विधानसभेत) करून दाखवा, हे राज्य तुमच्या हातात देतो, असे आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केले आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

शरद पवार आज बारामतीत दुष्काळी दौऱ्यानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद सांधत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक झाली तुम्ही काय करायचे ते काम उत्तम केलं. त्यात काही कमतरता भासू दिली नाही. पावसाची कमरता आहे, पण मतांची कमतरता भासू दिली नाही, आणि तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून दिला, असे  शरद पवार बोलताच एकच हशा पिकला.

मोदींची गॅरंटी आता संपली, ही गॅरंटी लोक ऐकत होते, मात्र त्यात आता बदल झाला. ही संपवण्याची ताकद तुमच्यात होती. या देशामध्ये आम्हा लोकांपेक्षा शहाणपणाचे निकाल तुम्ही देता. सामान्य माणूस हा शहाणा आहे. त्या सामान्य माणसाच्या शहाणपणाच्या जोरावर निर्णय घेतले जातात आणि मोठ्या मोठ्यांना त्यांची जागा दाखवली जाते. हे लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही दाखवून दिल्याचे शरद पवारांनी यावेळी म्हटले.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

माझी खात्री आहे लोकसभा निवडणुकीत तुम्ही जे करून दाखवलं, ते आणखीण तीन महिन्यांनी करून दाखवा. राज्य तुमच्या हातात देतो, असे आवाहन शरद पवारांनी बारामतीत शेतकऱ्यांना केले.  तसेच सत्तेचा उपयोग तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी केला जाईल, अशी स्थिती निर्माण करायची आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे देखील शरद पवारांनी म्हटले आहे.