मोईन अलीच्या 17 वर्षीय पुतण्याचे धमाकेदार पदार्पण! 213 स्ट्राइक रेटने ठोकले रन, चौकार-षटकारांचा पाऊस

0
15

इंग्लंडला मोईन अलीसारखा दुसरा खेळाडू मिळाल्याचे संकेत मिळत आहेत — तोही त्याचाच पुतण्या! १७ वर्षीय इसाक मोहम्मद याने T20 ब्लास्ट स्पर्धेत डरहमविरुद्ध आपल्या पदार्पणात धडाकेबाज खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

वोर्सेस्टरशरकडून खेळणाऱ्या इसाकने फक्त १५ चेंडूत ३२ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि ३ भेदक षटकारांचा समावेश होता. त्याने 213.33 स्ट्राइक रेटने खेळ करताना सामन्याची सुरुवातच आक्रमक पद्धतीने केली आणि संघासाठी मजबूत पाया घातला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vitality Blast (@vitalityblast)

या खेळीत इसाकचे अनेक शॉट्स हे मोईन अलीच्या बॅटिंग स्टाईलची आठवण करून देणारे होते. विशेषतः त्याने दुसऱ्याच षटकात मारलेला पहिला षटकार — तो अगदी मोईनच्या ‘सिग्नेचर स्टाईल’मध्येच होता.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

डरहमने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वोर्सेस्टरशरने हे आव्हान फक्त १७.१ षटकांत आणि ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इसाकच्या सुरुवातीच्या आक्रमक खेळामुळे हा विजय सोपा झाला.

इसाक मोहम्मदच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि क्रिकेटप्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्याला ‘मोईन 2.0’ अशी संज्ञा दिली असून इंग्लंडच्या भविष्यातील स्टार म्हणून पाहू लागले आहेत.