……मला पदमुक्तची मागणी, अचानक दिल्ली दौरा अन् जळगावच्या जाहिरातीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

0

“आम्ही संविधान बदलणार हा खोटा प्रचार, आम्ही मराठा आरक्षणाविरोधी आहोत. जातीपातीच राजकारण केलं, गोंधळाच राजकारण विजयात बदलल. आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला” असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्पष्टीकरण देत असले तरी केंद्रीय पातळीवरून महाराष्ट्र मध्ये खूप मोठे बदल करणे सुरू आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वाताहत होत असताना महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे ज्याने शंभर टक्के विजय मिळवून दिला तो म्हणजे ….जळगाव! आणि त्या चेहऱ्याला सर्वदूर महाराष्ट्र मध्ये मान्यता असताना पक्षांतर्गत राजकारणाला बळी पडून अतोनात त्रास सहन करावा लागला ते म्हणजे एकनाथ खडसे. केंद्रीय स्तरावरून राज्यात फेरबदल होण्याची संकेत दिल्यानंतर या नेतृत्वाने टायगर अभी जिंदा है अशा जाहिराती जिल्हाभर केल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा हा चेहरा प्रमुख स्थानी येईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

“इंडिया आघाडीने जातीच राजकारण केलं, त्या आधारावर मत मागितली. हे काही दिवसांसाठी ठीक आहे. प्रत्येक समाजाला समजेल, इंडिया आघाडीने खोट बोलून मत मागितली. हे लोक जातीयवादाच राजकारण करुन जिंकू शकतात. यांच्याकडे सांगण्यासारख विकासाच काम नाही. फक्त नरेटिव्ह सेट करु शकतात” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आता EVM वर का बोलत नाही? असा सवाल बावनकुळेंनी विचारला. “जनता एकदा भ्रमित होऊ शकते, वारंवार होत नाही. विकासाचा राजकारण देशाला पुढे घेऊन जाणार” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, त्यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केलीय, त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते राज्याचे नेते आहेत. पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मोदीजींच्या विकासाच्या योजनांची अमलबजावणी केली”

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

‘जातीयवादाच्या राजकारणात आमच्या विरुद्ध मतदान’

“या राज्यात साडेसहाकोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे. प्रत्येकाला घरकुल देण्याच काम झालं. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कृषी सन्मान योजना आणली, तरीही जनतेने काही क्षणांसाठी आमच्यापासून दूर जाऊन जातीयवादाच्या राजकारणात आमच्या विरुद्ध मतदान केलं. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना वाईट वाटलं. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र भाजपाच्या कोअर ग्रुपने त्यांना विनंती केलीय ते आमची विनंती मान्य करतील अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहून संघटनेच काम करु शकlतात. हे भ्रमित, जातीपातीच राजकारण यातून महाराष्ट्र बाहेर येऊन पुन्हा विकासाच्या वाटेवर येईल” असं बावनकुळे म्हणाले

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा