खडकवासल्यात अभ्यासू विनम्र नेतृत्वाची एंट्री; नवा गंध नवा आनंद! नगरसेवक दिलीप(आण्णा)चा नव संकल्प

0

खडकवासला विधानसभा मतदारसंघ पुणे शहराच्या पश्चिम दक्षिण टोकाला समांतर असणाऱ्या या विधानसभा मतदारसंघांमध्ये आता नव्या अभ्यासू नेतृत्वाची चर्चा सुरू झालेली आहे. ग्रामपंचायत सरपंच ते पुणे महानगरपालिकेतील आदर्श नगरसेवक असा यशस्वी टप्पा पार केल्यानंतर कोथरूड– बावधन भागातील लोकांचे हक्काचे नगरसेवक दिलीप (आण्णा) वेडेपाटिल यांनी जन्मदिवसाच्या निमित्ताने खडकवासला विधानसभा मतदारसंघ लढण्याचा नवा संकल्प केला असून वाढदिवसाचे निमित्ताने त्याचे रणसिंगही फुकले आहे. पुणे महानगरपालिकेत बावधन गावाचा समावेश झाल्यापासून अनेक प्रशासकीय पातळीवरती गावच्या विकासासाठी अहोरात्र केलेले प्रयत्न आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून संधी मिळाल्यानंतर परिसराचा सर्वांगीण आणि सुयोग्य पद्धतीने विकास करण्यासाठी कृतीबद्धता या सर्व गोष्टीमुळे आज  कोथरूड– बावधन परिसरामध्ये एक अभ्यासू आणि प्रशासकीय जाण असलेल्या नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजातील गरजवंतांसाठी मदत ही जबाबदारी समजत भक्कम उभे राहण्याची भूमिका घेतल्यामुळे कोथरूड बावधन वारजे यासह खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये हक्काचा ‘आधारवड’ म्हणून पाहिलं जात आहे.

विनम्र अभ्यासू अन् धुरंदर व्यक्तिमत्व…

बावधन ग्रामपंचायतीचा समावेश पुणे महापालिकेत झाल्यानंतर खरंतर या नेतृत्वाच्या कलागुणांना वाव मिळण्यास सुरुवात झाली.अत्यंत विनम्र आणि वरिष्ठाप्रती अतिव निष्ठा अशी या नेतृत्वाची ओळख आणि ख्याती राहिली. सामाजिक जीवनात प्रवास सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात अत्यंत खडतर गेला पक्षीय राजकारणामुळे अत्यंत हानी ही झाली परंतु स्वर्गीय माजी खासदार आणि पुण्याचे पितृतुल्य व्यक्तिमत्व गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पक्षामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला आणि कलागुणांना वाव मिळाला आणि त्याची परिमिती म्हणजे परिसराचा सर्वांगीण विकास अन सोयी सुविधांची रेलचेल यामुळे या व्यक्तिमत्त्वातील कलागुणांचे घराघरात कौतुक होऊ लागले. पुणे शहराचे पश्चिम द्वार आणि त्या लगेच वसलेलं बावधन सर्वांगीण विकसित करण्याचा केलेला संकल्प कयास गेल्यानंतर दिलीप वेडे पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने विधानसभा लढवण्याचा संकल्प केला असून त्यानिमित्ताने तयारीला सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

चांदणी चौक एक उद्दिष्टपूर्ती

बावधन भागाचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये झाला होता परंतु खरी अडचण होती ती चांदणी चौकातील वाहतूक कोंडी…. जोपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटत नाही तोपर्यंत बावधनच्या विकासाला खीळ आहे याची सल कायम मनात होती. ग्रामपंचायत सरपंच असल्यापासून या वाहतूकोंडीला काहीतरी पर्याय मिळावा यासाठी कायम पाठपुरावा केला परंतु पदरी यश मिळाले नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदी निवड झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून बावधनचा विकास साध्य करण्यासाठी चांदणी चौक रुंदीकरण होणे आवश्यक असल्याची जाण मनात ठेवून कायम याचा पाठपुरावा केला. 1000 कोटी रुपये खर्च करून बावधनच्या विकासाची द्वारे खुली करत खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी एक अभिमानास्पद प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीही अहोरात्र प्रयत्न केले. चांदणी चौक प्रकल्पावरून अनेक श्रेयवादाचे नाट्यरंगले परंतु या चांदणी चौकाची खरी गरज आणि महत्व फक्त दिलीप वेडेपाटील यांना लक्षात होते त्यामुळेच त्यांनी कोणतीही प्रसिद्धी किंवा श्रेय घेण्यापेक्षा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी (सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्थानिक लोकांचं सहकार्य) करण्याचा संकल्प केला आणि चांदणी चौकाचे आजचे जे बदललेल रूप आहे ती त्याची उद्दिष्ट प्राप्ती आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

प्रशासकीय पाठपुराव्याचा अतिउच्च अनुभव

पुणे महानगरपालिकेत बावधन गावाचा समावेश झाला खरा परंतु त्यानंतर निर्माण झालेल्या अत्यंत कठीण परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत गेली. पुणे महापालिकेचा प्रशासकीय घोळ यामुळे नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी सुरुवातीपासून दिलीप वेडे पाटील यांनी प्रशासकीय कामात सूसुत्रता आणण्यासाठी केलेलं काम आणि त्यासाठी केलेला पाठपुरावा यामुळे प्रशासकीय पातळीवरती काम मार्गी लावण्यासाठी गेली पंधरा वर्षाचा त्यांच्या पाठीमागे अनुभव आहे. या भागातील लोकांची शासकीय तिहेरी अडचण झालेली आहे. बावधन खु।। चा भाग खडकवासला विधानसभा मतदारसंघात तर पुणे महानगरपालिकेच्या प्रभागाची रचनेत कोथरुडमध्ये व्यवस्था तर तहसील व महसुली दप्तरी मुळशी तालुका असल्याने या भागातील लोकांची कायमच प्रशासकीय ससेहोलपट होतं होती. बावधन भागातील नागरिकांना हक्काचे शासकीय अन्नधान्य मिळवण्याचा मार्ग दिलिप आण्णा वेडेपाटिल यांनी मुळशी तहसील यांच्याकडे पाठ – पुरावा करत अन्नधान्य वितरण व्यवस्था देण्याची सोय केली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा