PM मोदींसमोरच राज ठाकरेंनी ठेवल्या ‘या’ 6 मागण्या

0

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची आज (17 मे) मुंबईत जाहीर सभा आहे. आतापर्यंत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मात्र लोकसभा निवडणूक 2024 साठी राज ठाकरेंनी भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

राज ठाकरे यांनी PM मोदींसमोर कोणत्या मागण्या मांडल्या?

1) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा.

2) देशाच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा.

3) शिवछत्रपतींचे गडकिल्ले हीच खरी स्मारके. या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी.

4) मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर करावा.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

5) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधीही धक्का लावणार नाही, हे सांगा. आणि मूठभर मुस्लीम विरोधात, पण इतर सगळे आपल्यासोबत आहेत. मूठभर मुस्लिमांचे अड्डे तपासा, तिथे सैन्य घुसवा आणि देश कायमचा सुरक्षित करून टाका.

6) मुंबईतील लोकल रेल्वे व्यवस्थित कशी होईल, हे पहावं