भाजपला २२४ पैकी या ७९ जागा हव्याच! सर्वाधिक ४० जागा येथे; महाराष्ट्रात 15-12 चे गणितं म्हणून मोदींचा जोर

0
1

भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील ३०३ जागांच्या यशाची पुनरावृत्ती करून सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेतील ७९ जागा कळीच्या ठरणार आहेत. या जागा गमावल्या तर भाजपला बहुमत मिळणे कठीण होऊ शकते. २०१९ मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालेल्या २२४ जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक ४० जागा उत्तर प्रदेशातील आहेत. त्याखालोखाल गुजरात (२६), मध्य प्रदेश (२५) आणि राजस्थान (२३) या राज्यांत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळाल्या होत्या. तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून भाजपेतर पक्षांनी ११९ जागा जिंकल्या होत्या. देशभरातील ५४३ जागांपेकी ३४३ जागांवर ५० टक्के मतदान झाले होते. यापैकी सुमारे एक डझन जागा या महाराष्ट्रात असल्यामुळे यासाठी नरेंद्र मोदी यांनी जोर लावला आहे आणि त्याचाच भाग म्हणजे नरेंद्र मोदींचा अतिप्रचार हा महाराष्ट्राला लाभला आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

उत्तर प्रदेश गुजरात आणि राजस्थान नंतर हक्काचं राज्य म्हणून यापूर्वी महाराष्ट्राकडे पाहिले जात होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये झालेल्या स्थित्यंतरामुळे महाराष्ट्रातील गणिते बिघडलेली आहेत. त्यातच टक्केवारीचा विचार केला तर भाजपच्या पारड्यात असलेल्या 15 जागांमध्येही घट होण्याची शक्यता लक्षात घेऊनच नरेंद्र मोदी यांच्या वतीने राज्यात जोर दिला जात आहे. महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक या शहरी पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण असल्याचे आकडेवारी पक्षाकडे असल्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने केले जात आहे.

२०० जागा खुल्या…

पाच वर्षांपूर्वी भाजपने एकूण ३०३ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून भाजपने ७९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा भाजपसाठी पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे मानले जाते. या जागांवर भाजप व ‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये तगडी लढत होऊ शकते. २०१९ मध्ये ‘एनडीए’ व ‘इंडिया’तील घटक पक्षांनी २०० जागांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून विजय मिळवला होता. या जागा यावेळीही दोन्ही आघाड्यांसाठी खुल्या असल्याने त्यातील अधिक जागा जिंकणारी आघाडीच बहुमताचा आकडा पार करू शकेल.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

२०१९ मध्ये ५० टक्के मतदान झालेल्या जागा

भाजप विजयी (२२४)

जम्मू-काश्मीर-२,

चंदिगड-१,

हरियाणा-९,

दिल्ली-७,

हिमाचल प्रदेश-४,

 उत्तराखंड-५,

उत्तर प्रदेश-४०,

पंजाब-१,

राजस्थान-२३,

गुजरात-२६,

बिहार- १४,

अरुणाचल प्रदेश-२,

आसाम-७,

त्रिपुरा-१,

झारखंड-८,

मध्य प्रदेश-२५,

छत्तीसगढ-६,

पश्चिम बंगाल-५,

महाराष्ट्र- १५,

गोवा-१,

कर्नाटक-२२.

(शिवसेना-१०, जनता दल (सं)-११ व अन्य भाजप समर्थक पक्ष- ११. आता शिवसेना फुटीने समीकरण बदल)

भाजपेतर विजयी (११९)

जम्मू-काश्मीर-१,

पंजाब-२,

राजस्थान-१,

उत्तरप्रदेश -१५,

बिहार-१७,

अरुणाचल प्रदेश-२,

आसाम-१,

 मेघालय-२,

झारखंड-१,

ओदिशा-३,

तेलंगणा-४,

पश्चिम बंगाल-६,

आंध्र प्रदेश-१३,

पुडुचेरी-१,

तमिळनाडू-२७,

केरळ-८,

कर्नाटक-३,

महाराष्ट्र-१२.