मुंबईतील मतदानापूर्वी महायुतीकडून राज ठाकरेंवर ‘ही’ मोठी जबाबदारी?

0

महायुतीकडून राज ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेने महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे सभा घेत आहे. ठाण्यात आणि कोकणात राज ठाकरेंच्या सभा झाल्या आहेत. आता 17 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सांगता सभा मुंबईत शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. या सभेचे निमंत्रण देखील देणार आहेत. मनसेने पाठींबा जाहीर केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी सध्या महायुतीच्या उमेदवारासाठी काम करत आहेत. 17 मे रोजी मोदी आणि राज ठाकरे हे एकाच व्यसपीठावर असणार आहे. त्यावेळी ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

मराठी मतापर्यंत कसे पोहचायचे?

शिवाजी पार्कवर होणाऱ्या या सभेची मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. मुंबईतील सहा जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत मनसेची ताकद तेवढीच महत्त्वाची आहे. मराठी मताचा टक्का हा मनसेकडे देखील आहे. त्यामुळे मराठी मतांची जबाबदारी मनसेच्या खांद्यावर देण्यात आली आहे.मुंबईतील प्रत्येक जागा निवडून आणायची असेल तर मराठी मते ही तेवढीच महत्त्वाची आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मुंबईत प्रचार कशा प्रकारे करायचे आहे. मराठी मतापर्यंत कसे पोहचायचे याची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

राज ठाकरेंवर कोणती जबाबदारी देणार?

बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे सध्या महायुतीच्या उमेदवारंचा प्रचार करत आहे. राज ठाकरे देखील सभा घेताना दिसत आहे. मुंबईतील महायुतीचे उमेदवार, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. आता बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. राज ठाकरेंवर या भेटीत कोणती जबाबदारी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.